ETV Bharat / international

अमेरिका : इलिनॉयमधील बॉलिंग अ‌ॅली येथे झालेल्या गोळीबारात 3 ठार - अमेरिका लेटेस्ट न्यूज

अमेरिकेच्या इलिनॉय राज्यात बॉलिंग अ‌ॅली येथे एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यात दोन किशोरवयीन मुलेही होती. जखमींची स्थिती आणि वय अद्याप समजू शकले नाही, तसेच घटनेत ठार झालेल्या लोकांचे वयही समजलेले नाही.

अमेरिकेच्या बॉलिंग अ‌ॅलीमध्ये गोळीबार न्यूज

author img

By

Published : Dec 27, 2020, 6:00 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या इलिनॉय राज्यात बॉलिंग अ‌ॅली येथे एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शिकागोपासून सुमारे 140 किलोमीटरवर रॉकफोर्डमधील बॉलिंग अ‌ॅली येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेत 3 लोक जखमीही झाले आहेत, असे वृत्त सिन्हुआने दिले आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रॉकफोर्डचे पोलीस प्रमुख डॅन ओशिया म्हणाले की, ज्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यात दोन किशोरवयीन मुलेही होती. जखमींची स्थिती आणि वय अद्याप समजू शकले नाही, तसेच घटनेत ठार झालेल्या लोकांचे वयही समजलेले नाही.

हेही वाचा - ख्रिसमसच्या दिवशी वीज गायब! अमेरिकेत लाखाहून अधिक लोक प्रभावित

ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, तेथून दूर राहण्याचे आवाहन रॉकफोर्ड पोलीस विभागाने लोकांना केले आहे. ओशिया म्हणाले की, गोळीबारात काही लोकांना इमारतीच्या बाहेर गोळ्या घातल्या गेल्या आणि काहींना इमारतीच्या आत गोळ्या घालण्यात आले असा पोलिसांचा तर्क आहे.

पोलीस येईपर्यंत संशयित इमारतीत होता. गोळीबाराचे कारण समजलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा - अमेरिकेत हिवाळी वादळात 5 ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.