अदिस अबाबा - आफ्रिकन खंडातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची एकूण संख्या 21 लाख 37 हजार 871 पर्यंत पोहोचली आहे. तर, संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 51 हजार 248 वर पोचली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - इराणमध्ये कोविड रुग्णांची संख्या 9 लाखांच्या पुढे
सिन्हुआच्या अहवालानुसार, आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनने (आफ्रिका सीडीसी) शनिवारी या विषाणूची लागण झालेले एकूण 18 लाख 7 हजार 531 लोक बरे झाल्याचे शनिवारी सांगितले.
आफ्रिका सीडीसीच्या आकडेवारीनुसार, या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, इजिप्त आणि इथिओपिया या देशांचा समावेश आहे.
हेही वाचा - तुर्कीमध्ये 24 तासांतील सर्वाधिक कोविड-19 रुग्णांची नोंद