त्रिपोली (लिबिया) - लिबिया देशातील दैनंदिन तेलाचे उत्पादन १ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त झाले आहे, असे लिबियन सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय तेल कॉर्पोरेशनने (एनओसी) शनिवारी सांगितले. तेलाचे उत्पादन 1,036,035 बॅरलपर्यंत वाढवण्यास आम्ही यशस्वी झालो, असल्याचे एनओसीने जाहीर केले आहे.
एनओसीच्या प्रयत्नांना अडथळा-
एनओसीने म्हटले आहे की, ते सध्याचे उत्पादन पातळी टिकवून ठेवू शकत नाही. ती कमी होईल किंवा पूर्णपणे थांबविली जाऊ शकते. उत्पादन वाढेल आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची भरभराट होईल, त्यामुळे काही संस्था एनओसीच्या प्रयत्नांना अडथळा आणत आहेत.
सेवा कंपन्यांना देयके देण्यास विलंब
एनओसीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांवर कर्ज झाले आहे. त्यामुळे सेवा कंपन्यांना देयके देण्यास विलंब होत असल्याचे एनओसीने म्हटले आहे. एनओसीने अलीकडेच देशातील तेलक्षेत्र आणि बंदरांवरील सक्ती उठवली आणि तेल उत्पादन आणि निर्यात पुन्हा सुरू केले आहे.
हेही वाचा- सासरेबुवा आता तरी माघार घ्या! जारेड कुशनरने घेतली ट्रम्प यांची भेट
हेही वाचा- विरुष्काने यूएईमध्ये घेतला जादुई सूर्यास्तातील समुद्रस्नानाचा आनंद