वॉशिंग्टन - आयफोन एसई+5जी ( iPhone SE+5G ) या अॅपल स्मार्टफोनच्या थर्ड जेनरेशन मोबाईच्या लॉंचिंगची तयारी सुरु झाली आहे. तसेच हा फोन 5G सपोर्टसह बाजारात येणार आहे. हा फोन मार्च किंवा एप्रिलमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
असा असेल आयफोन एसई+5जी -
नावाप्रमाणेच, ते सध्याच्या iPhone SE प्रमाणेच डिझाइन आणि त्याच 4.7-इंचाच्या LCD पॅनेलसह 5G कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. ज्यामध्ये मुख्य नवीन वैशिष्ट्य म्हणजे वेगवान A15 चिप बसवण्यात आली आहे. iPhone SE+ 5G मध्ये Apple iPhone 8 सारखी डिझाइन असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 2023 किंवा 2024 मध्ये, नवीन पिढीचा iPhone SE 5.7" येणार आहे.