ETV Bharat / headlines

माझ्या भावाला न्याय द्या.. सुशांतच्या बहिणीची पंतप्रधान मोदींकडे याचना

' मी सुशांतसिंग राजपूतची बहीण आहे. आणि मी त्याच्या आत्महत्या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची विनंती करत आहे. आम्ही भारताच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि कोणत्याही किमतीवर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. ' या माध्यमातून श्वेताने पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी याचना केलीय.

भावाला न्याय द्या.. सुशांतच्या बहिणीची पंतप्रधान मोदींकडे याचना

author img

By

Published : Aug 1, 2020, 11:13 AM IST

पाटणा- सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता त्याची बहीण श्वेता किर्ती हिने पुन्हा एकदा सुशांतसिंगचा फोटो प्रसिद्ध करत न्याय मागितला आहे. यावेळी तिने थेट पंतप्रधान मोदींकडे न्यायाची याचना केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर सुशांतचा फोटो शेअर करताना ती पोस्ट पंतप्रधान मोदींना टॅग केली आहे.

तिने केलेल्या पोस्ट मध्ये न्याय मागताना म्हंटले आहे की,' मी सुशांतसिंग राजपूतची बहीण आहे. आणि मी त्याच्या आत्महत्या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची विनंती करत आहे. आम्ही भारताच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि कोणत्याही किमतीवर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. ' या माध्यमातून श्वेताने पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी याचना केलीय.

श्वेताने हे प्रकरण समजून घेण्याची विनंती करत पुढे म्हटले आहे की,

माझ्या भावाचा चित्रपट दुनियेत कोणी गॉडफादर नाही.आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. फक्त माझा भाऊ आमच्या परिवारातून बॉलीवूडमध्ये स्टार होता. तरी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन यातील पुराव्यामध्ये छेडछाड होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे.

यापूर्वी देखील श्वेताने 'सुशांतच्या न्यायासाठी एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने म्हटले होते की कधी खऱ्या गोष्टींना महंत नसेल तर कोणत्याच गोष्टींना महत्त्व नसतं, सुशांतसिंग ला न्याय हवा' असे ती म्हणाली होती.

तसेच एका व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने मुंबई पोलिसांच्या अहवाल आल्यानंतर सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.