ETV Bharat / headlines

शबरीमला मंदिर 14 जूनला उघडणार, दर्शनासाठी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आवश्यक - Sabarimala temple to reopen news

एका वेळी जास्तीत जास्त 200 लोकांना मंदिरात दर्शन घेण्याची मुभा असेल. तर, गर्भगृहाजवळ एका वेळी फक्त 50 लोकांना परवानगी दिली जाईल. तसेच, गर्भगृहाच्या आत केवळ 5-5 जणांना गटागटाने दर्शनासाठी सोडण्याचा विचार सुरू आहे. पहाटे 4 ते दुपारी 1 पर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 11 अशी दर्शनाची वेळ असेल. केवळ पंबामार्गे मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी असेल. इतर सर्व प्रवेशद्वारे बंद राहतील.

शबरीमला मंदिर न्यूज
शबरीमला मंदिर न्यूज
author img

By

Published : Jun 7, 2020, 9:09 AM IST

तिरुअनंतपुरम - तब्बल 75 दिवसांनंतर केरळमधील शबरीमला मंदिर 14 जूनला अय्यप्पा भक्तांसाठी खुले होणार आहे. येथे केवळ रांगेद्वारे दर्शन घेण्यास परवानगी दिली जाईल. तसेच, सध्याच्या कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. हे मंदिर ‘मिधुनमासा पूजा’ (मल्याळम दिनदर्शिकेत मिधुनम महिन्यातील मासिक पूजा) आणि मंदिर उत्सवासाठी उघडले जाणार आहे.

केरळमधील मंदिरे, प्रार्थनास्थळे मंगळवारपासून भाविकांसाठी पुन्हा सुरू होणार आहेत. सरकार आणि देवस्वम बोर्डाने शबरीमला अयप्पा मंदिरासारख्या प्रमुख मंदिरात यात्रेकरूंना आगाऊ आरक्षणाच्या माध्यमातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे निर्बंध घालण्याचा आणि अन्य राज्यातील यात्रेकरूंसाठी कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्याचे ठरवले आहे.

एका वेळी जास्तीत जास्त 200 लोकांना मंदिरात दर्शन घेण्याची मुभा असेल. तर, गर्भगृहाजवळ एका वेळी फक्त 50 लोकांना परवानगी दिली जाईल. तसेच, गर्भगृहाच्या आत केवळ 5-5 जणांना गटागटाने दर्शनासाठी सोडण्याचा विचार सुरू आहे. पहाटे 4 ते दुपारी 1 पर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 11 अशी दर्शनाची वेळ असेल. केवळ पंबामार्गे मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी असेल. इतर सर्व प्रवेशद्वारे बंद राहतील.

'मंदिरात दर्शनासाठी इतर राज्याहून येणाऱ्या भाविकांनी केरळ सरकारच्या ई-जाग्रता पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना त्यांना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. केवळ त्यांनाच राज्यातील कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करून दर्शनाची परवानगी दिली जाईल,' असे केरळ देवस्वम मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन म्हणाले.

अ‍प्पम आणि अरावण प्रसाद मिळविण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. नेव्याभिषेकमच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था केली जाईल. अभिषेक करण्यासाठी तूप दिल्यानंतर काउंटरवरून अभिषेक झाल्यानंतर भाविकांना तूप मिळू शकते.

पंबा पर्यंत केएसआरटीसीच्या बसेस चालवल्या जातील. पंबापर्यंत भाविक खासगी वाहनांमधूनही पोहोचू शकतात. पुढच्या आठवड्यात मासिक पूजा व त्यानंतर खास अनुष्ठानानंतर 28 जूनला मंदिर बंद केले जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.