- 2.10 - पंधराव्या फेरी अखेर रक्षा खडसे १ लाख ७८ हजार ४८ मतांनी आघाडीवर
- 1.50 - बाराव्या फेरी अखेर काँग्रेच्या डॉ. उल्हास पाटील यांना १ लाख ८१ हजार ५५० इतकी मते तर भाजपच्या रक्षा खडसे ३ लाख ३९ हजार ५0 इतकी मते
- 1.47 - अकराव्या फेरी अखेर काँग्रेच्या डॉ. उल्हास पाटील यांना १ लाख ६४ हजार ६३३ इतकी मते तर भाजपच्या रक्षा खडसे ३ लाख १ हजार ६३ इतकी मते
- 1.20 - दहाव्या फेरी अखेर रक्षा खडसे १ लाख ३० हजार ७९७ मतांनी आघाडीवर
- 1.17 - दहाव्या फेरी अखेर काँग्रेच्या डॉ. उल्हास पाटील यांना १ लाख ४४ हजार १५९ इतकी मते तर भाजपच्या रक्षा खडसे २ लाख ७४ हजार ९५६ इतकी मते
- 1.00 - नवव्या फेरी अखेर काँग्रेच्या डॉ. उल्हास पाटील यांना १ लाख ३२ हजार ३७४ इतकी मते तर भाजपच्या रक्षा खडसे २ लाख ४३ हजार ७८६ इतकी मते
- 12.00 - आठव्या फेरी अखेर - रक्षा खडसे १ लाख १० हजार मतांनी आघाडीवर
- 11.30 - पाचव्या फेरी अखेर काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांना ६५ हजार ३३३ इतकी मते
- 11.30 - पाचव्या फेरी अखेर भाजपच्या रक्षा खडसे यांना १ लाख ४१ हजार ६०८ इतकी मते
- 11.25 - भाजपच्या रक्षा खडसे ७६ हजार २७५ मतांनी आघाडीवर
- 11 - भाजपच्या रक्षा खडसे ८० हजार मतांनी आघाडीवर
- 9.45 चौथ्या फेरी अखेर भाजपच्या रक्षा खडसे ४९ हजार मतांनी आघाडीवर
- 9.00 - भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर
- 8.00 - मतमोजणीला सुरूवात
- 7.15 - मतमोजणीकेंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी दाखल
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे भाजपकडून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे आणि काँग्रेसकडून उल्हास पाटील या दोन्ही तगड्या उमेदवारांमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळाली. आज या निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी जळगाव येथील महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन या ठिकाणी होत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२०१४ साली ६३.४८ टक्के मतदान झाले होते. तर यंदा ६१.४० टक्के मतदान झाले आहे. जातीय मतांचे विचार करून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी दोन्ही लेवा समाजाचे तगडे उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात धाडले होते. दोघा उमेदवारांनीही आपापल्या परीने मतदारसंघ पिंजून काढला होता. या मतदारसंघातील पक्षीय वर्चस्व पाहता, भुसावळची बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. हे वगळता विविध स्थानिक स्वराज्य संस्था भाजप-सेना युतीच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वाद मिटल्यासारखे असल्याने आघाडी मजबूत दिसून आली. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व खडसेंमधील हाडवैर पाहता त्याचा निवडणुकीवर थेट परिणाम होईल. यामुळे या लढतीत दिल्लीवारी कोण करेल याकडे रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून आहे.