नवी दिल्ली - जर तुम्ही आधार कार्ड हे पॅनबरोबर जोडले (लिंक) केले नसेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासाठीची अंतिम तारिख पुढे ढकलली आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड-पॅन लिंक करण्यासाठी आजवर अकराहून अधिक वेळा मुदतवाढ दिली आहे. आता बाराव्यांदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी ही मुदत संपणार होती. आता तिला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आजतागायत अकराहून अधिक वेळा आधार व पॅनकार्ड जोडण्याची मुदत वाढवली आहे. आता पुन्हा याला मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीत टाळेबंदीचे नियम लागू नसल्याने मार्चमध्ये आधार हे पॅनला लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. ही मुदत या महिन्यात संपत होती.
हेही वाचा-मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेकरिता फेसबुकची मोहिम; अभिनेत्री नेहा धुपियाही सहभागी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पॅन कार्ड हे आधारला जोडणे बंधनकारक
2018 मधील सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड योजना संवैधानिकदृष्ट्या वैध असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे पॅन कार्ड हे आधारला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी पॅनकार्ड हे आधारला जोडणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते.
अशी करा पॅनची आधारला जोडणी
- 567678 किंवा 56161 या क्रमांकावर UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक><स्पेस>10 अंकी पॅन क्रमांक> असा संदेश पाठवा.
- www.incometaxindiaefiling.gov.in. या ई-फायलिंग वेबसाईटवरूनही जोडणी करू शकता.
आधार-पॅन कार्ड लिंक नाही केले तर भरावा लागू शकतो मोठा दंड-
जर आधार हे पॅन कार्डला जोडले नाही तर पॅन कार्ड हे चालू नसल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. तसेच टीडीएसच्या दरावरही परिणाम होणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडले नसल्याने आयटीआर भरता येणार नाही. त्यामुळे करदात्यांना 10 हजारांचा दंड भरावा लागू शकतो.
हेही वाचा-चिंता नको! ईपीएफओकडून पीएफ खाते आधारला लिंक करण्याकरिता मुदतवाढ
आधार कार्ड नसले तरी लसीकरणासह आवश्यक सेवा टाळता येणार नाही-युआयडीएयआय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएयआय) आधार नसेल तर लस, औषधे, रुग्णालयातील उपचार नाकारता येणार नसल्याचे म्हटले आहे. काही रुग्णालयांनी आधार कार्ड नसल्याने सेवा नाकारल्याचे समोर आले होते. त्यावरून युआयडीएयआयने यापूर्वीचस्पष्ट केले आहे. कोरोना महामारीच्या काळात कोणीही केवळ आधार कार्ड नसल्याने आवश्यक सेवा नाकारू शकणार नाही. आवश्यक सेवा टाळण्यासाठी आधारचा गैरवापर करू नये, असे युआयडीएयआयने म्हटले आहे. आधार कायद्यानुसार जर रहिवासी व्यक्तीकडे आधार नसेल तरीही आवश्यक सेवा टाळता येत नाही. आधारचा उपयोग हा सार्वजनिक सेवेमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यासाठी आहे. मात्र, आधार कार्ड नसल्याने लाभार्थ्यांना सेवा टाळता येणार नसल्याचे युआयडीएयआयने म्हटले आहे.
हेही वाचा-सराफांना हॉलमार्किंग सक्तीच्या करण्यात सरकार एक पाऊल मागे; 'अशी' होणार अंमलबजावणी
करदात्यांना पॅनकार्ड हे आधारला जोडण्याशिवाय पर्याय नाही-
जर आधारला पॅन कार्ड जोडणी नसेल तर, पॅन कार्ड सुरू राहणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने गतवर्षी मार्चमध्ये स्पष्ट केले आहे. पॅन आणि आणि आधार जोडणी करणे बंधनकारक आहे. हे तुम्ही बायोमेट्रिक आधार पडताळणीनेही करू शकता. तसेच एनएसडीएल आणि युटीआयटीएसएलच्या पॅन सेवा केंद्रातूनही जोडणी करणे शक्य आहे. अशी जोडणी भविष्यासाठी फायद्याचे असल्याचेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर परताव्यासाठी पॅनकार्ड हे आधारला जोडण्यासाठी बंधनकारक असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे करदात्यांना पॅनकार्ड हे आधारला जोडण्याशिवाय पर्याय नाही