वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी देखील जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जगभरामध्ये आतापर्यंत तब्बल 4 लाख 90 हजार 933 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत 52 लाख 51 हजार 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 लाख 90 हजार 933 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एकूण कोरोनाबाधितांची संख्या 96 लाख 99 हजार 562 वर पोहचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.
कोरोना विषाणूची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू झपाट्यानं जगभरात पसरत होता. चीनमध्ये हा विषाणू मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला. चीनमध्ये शुक्रवारी फक्त 13 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 4 हजार 634 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 83 हजार 462 जणांना कोरोनाची लागण झाली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे जागतिक व्यापार, उद्योग, पर्यटन, वाहतूक सर्व खोळंबली असून जगावर आरोग्य आणीबाणी आली आहे. अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे, त्यातच रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.