ETV Bharat / headlines

परभणीत पाच कॉपी बहाद्दरांना पकडले; ९७ टक्के विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा - इंग्रजी विषय

इंग्रजी विषयाच्या पेपरला ५ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गुरुवारी जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रावरून २४ हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ४६८ (९६.७०) जणांनी परीक्षा दिली असून ८०० विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

परभणी1
author img

By

Published : Feb 22, 2019, 8:40 AM IST

Updated : Feb 22, 2019, 11:13 AM IST

परभणी - बारावी परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला ५ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गुरुवारी जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रावरून २४ हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ४६८ (९६.७०) जणांनी परीक्षा दिली असून ८०० विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. दरम्यान, शहरी भागातील ४ परीक्षा केंद्र ऐनवेळी ग्रामीण भागात स्थलांतर केल्याने गोंधळ उडाला होता.

परभणी जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी कॉपी मुक्तीसाठी महसूलचे पथक स्थापन करून कॉपी करणाऱ्यांवर मोठा अंकुश लावला होता. त्यानंतर मात्र, कॉपीमुक्तीचा हा प्रयोग हळूहळू कमी होत गेला. गतवर्षी वादग्रस्त ठरलेल्या परीक्षा केद्रांना यावर्षी नव्याने मान्यता देण्यात आल्याने या परीक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐनवेळी ४ परीक्षा केंद्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर परीक्षेसाठी पाठविण्यात आले. यात पेडगाव परीक्षा केंद्रावर तब्बल १२०० विद्यार्थी तर टाकळी कु., इसाद, महातपुरी, धानोरा आदी परीक्षा केंद्रावर ६०० विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. या मागे मात्र कुठलेही ठोस कारण देण्यात आले नाही. ऐनवेळी संबंधित महाविद्यालयांना शिक्षण विभागाने पत्र पाठवून गोंधळ निर्माण केला. शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षार्थींना सामावून घेण्याची क्षमता असताना देखील ऐनवेळी परीक्षा मंडळाने गतवर्षी वादग्रस्त ठरलेल्या परीक्षाकेंद्रांवर परीक्षार्थी पाठविण्यामागे काय हेतू आहे, याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे.

undefined

दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागासह महसूल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. परीक्षा केंद्रांची निर्मिती, पर्यवेक्षकांची नियुक्ती तसेच बैठे आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी १ हजार ४५६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे.

परभणी तालुक्यात १९ परीक्षा केंद्र असून, या केंद्रांवर ९ हजार ८६३ परिक्षार्थी आहेत. पूर्णा तालुक्यात ५ परीक्षा केंद्रांवर १ हजार ८३६ परीक्षार्थी, गंगाखेड तालुक्यात आठ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९०, पालम तालुक्यात ४ केंद्रांवर १ हजार ४८४, सोनपेठ २ केंद्रावर ७५२, जिंतूर तालुक्यामध्ये ९ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ३६९ परीक्षार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

पाथरी तालुक्यात ३ केंद्रांवर १ हजार ८८, मानवत ३ केंद्रांवर १ हजार २९४ आणि सेलू तालुक्यामध्ये ३ केंद्रांवर १ हजार ४९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गुरुवारी इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत झाला. शिक्षण विभागाने या परीक्षा सुरळीत पार पडत असल्याचा दावा केला असून कॉपीला आळा घालण्यासाठी ५६ बैठे तर ९ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्रजी, गणित व विज्ञान या तिन्ही विषयांयासाठी महसूल विभागाने वेगळे पथक तयार केले आहे.

undefined

या शाळेत सापडले कॉपी बहाद्दर

सोनपेठ शहरातील महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात १ तर मानवत येथील रत्नपूर कानिष्ठ महाविद्यालयात ४ असे एकूण ५ कॉपी बहाद्दर विद्यार्थी पकडण्यात आले.

Intro:परभणी - आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपर दरम्यान 5 कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रावरून 24 हजार 368 विद्यार्थ्यांपैकी 23 हजार 468 (96.70) जणांनी परीक्षा दिली असून 800 विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. दरम्यान, शहरी भागातील 4 परीक्षा केंद्र ऐनवेळी ग्रामीण भागात स्थलांतर केल्याने गोंधळ उडाला होता.Body:परभणी जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी कॉपीमुक्त मुक्ती साठी महसुलचे पथक स्थापन करून कॉप्यांच्या सुळसुळाटावर मोठा अंकुश लावला होता. त्यानंतर मात्र कॉपीमुक्तीचा हा प्रयोग हळूहळू कमी होत गेला. गतवर्षी वादग्रस्त ठरलेल्या परीक्षा केद्रांना यावर्षी नव्याने मान्यता देण्यात आल्याने या परीक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ऐनवेळी 4 परीक्षा केंद्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर परिक्षेसाठी पाठविण्यात आले. यात पेडगाव परिक्षा केंद्रावर तब्बल १२०० विद्यार्थी तर टाकळी कु., इसाद, महातपूरी, धानोरा आदी परीक्षा केंद्रावर ६०० विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. या मागे मात्र कुठलेही ठोस कारण देण्यात आले नाही. ऐनवेळी संबंधित महाविद्यालयांना शिक्षण विभागाने पत्र पाठवून गोंधळ निर्माण केला. शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयात परिक्षार्थींना सामावून घेण्याची क्षमता असताना देखील ऐनवेळी परीक्षा मंडळाने गतवर्षी वादग्रस्त ठरलेल्या परीक्षाकेंद्रांवर परीक्षार्थी पाठविण्यामागे काय हेतू आहे, याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागासह महसूल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. परीक्षा केंद्रांची निर्मिती, पर्यवेक्षकांची नियुक्ती तसेच बैठे आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी १ हजार ४५६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. परभणी तालुक्यात १९ परीक्षा केंद्र असून, या केंद्रांवर ९ हजार ८६३ परिक्षार्थी आहेत. पूर्णा तालुक्यात ५ परीक्षा केंद्रांवर १ हजार ८३६ परिक्षार्थी, गंगाखेड तालुक्यात आठ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९०, पालम तालुक्यात ४ केंद्रांवर १ हजार ४८४, सोनपेठ २ केंद्रावर ७५२, जिंतूर तालुक्यामध्ये ९ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ३६९ परिक्षार्थ्याची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पाथरी तालुक्यात ३ केंद्रांवर १ हजार ८८, मानवत ३ केंद्रांवर १ हजार २९४ आणि सेलू तालुक्यामध्ये ३ केंद्रांवर १ हजार ४९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आज गुरुवारी इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत झाला. शिक्षण विभागाने या परीक्षा सुरळीत पार पडत असल्याचा दावा केला असून कॉपीला आळा घालण्यासाठी ५६ बैठे तर ९ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आले आहे. इंग्रजी, गणित व विज्ञान या तिन्ही विषयांयासाठी महसुल विभागाने वेगळे पथक तयार केले आहे.

"या शाळेत सापडले कॉपी बहाद्दर"
सोनपेठ शहरातील महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात 1 तर मानवत येथील रत्नपुर कानिष्ठ महाविद्यालयात 4 असे एकूण 5 कॉपी बहाद्दर विद्यार्थी पकडण्यात आले.
गिरीराज भगत, परभणी.
Sobat :- exam center वरील visConclusion:
Last Updated : Feb 22, 2019, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.