ETV Bharat / headlines

ब्राझील राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला कोरोनाची लागण

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांच्या पत्नी मिशेल बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही महिती राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जेइर बोल्सोनारो यांचा ही काही दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

मिशेल बोल्सोनारो
मिशेल बोल्सोनारो
author img

By

Published : Jul 31, 2020, 1:52 PM IST

रिओ दि जनेरिओ (ब्राझील) - ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांच्या पत्नी मिशेल बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिशेल यांच्यासह विज्ञान, तंत्रज्ञान मंत्री मार्कोस पोन्टेस यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ही महिती राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जेइर बोल्सोनारो यांचा ही काही दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

मी ठीक आहे, थोडी सर्दी आणि डोकेदुखीची काही लक्षणे आहेत. क्वारंटाइन असून सर्व काही ठीक होईल, असे त्यांनी मार्कोस पोन्टेस यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, जेइर बोल्सोनारो यांच्या जवळच्या तीन सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या यादीत ब्राझिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या महामारीत ब्राझिलमध्ये 26 लाख 13 हजार 789 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 91 हजार 377 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जेइर बोल्सोनारो यांनी कोरोनाला गांभीर्यानं घेतले नव्हते. ते अनेकदा विना मास्क फिरताना पाहायला मिळाले. 'लोकांची गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं शक्य होत नाही, म्हणून आपल्या देशाला उत्पादनं बंद करणं परवडणारं नाही. आता काही लोक मरणारच, त्याबद्दल दुःख आहे', असं धक्कादायक विधान बोल्सोनारो यांनी केलं होतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.