ETV Bharat / headlines

'एकास तीन हे भित्रे रडव्यांचे लक्षण; करुन दाखवा, रडून नको', आशिष शेलार यांचा पलटवार - आशिष शेलार

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सो़डले आहे. 'आघाडीची "तीन माणसं" बोलली की रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. कधी विरोधी पक्षाच्या नावानं रडायचं.. अरे थांबवा ही तुमची रडगाणी.. काही करुन दाखवा, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

भाजप नेते
भाजप नेते
author img

By

Published : May 28, 2020, 10:39 AM IST

मुंबई - कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांची पोलखोल करण्यात आली. आता महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सो़डले आहे.

'आघाडीची "तीन माणसं" बोलली की रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरू आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. कधी विरोधी पक्षाच्या नावानं रडायचं.. अरे थांबवा ही तुमची रडगाणी.. काही करुन दाखवा! तुम्ही मदत द्या, शेतकऱ्यांना पँकेज द्या, कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा, रडू नका', अशा शब्दांत भाजप नेते माजी मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

आमदार अॅड आशिष शेलार यांनी म्हटले की, विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले. त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला "आघाडीची तीन माणसं" धावली. घाबरताय कशाला? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे प्रमाण म्हणजे भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा, रडून नको, असे आशिष शेलार म्हणाले.

महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे, आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या"तीन माणसांच्या" दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकारांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि "तीन माणसं" एकमेकाकडे बघत बसले, असे शेलार म्हणाले. आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार ही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मानले.

तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले...पण किती रडणार? किती खोटं बोलणार? अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडवा ना, कुणी रोखलंय तुम्हाला, उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय? दुर्गंधी का सोडताय? त्यांना जमत नसेल तुम्ही करुन दाखवा, असेही शेलार म्हणाले.

महाराष्ट्रद्रोही तर तुम्ही आहात. तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. महाराष्ट्राला मागे घेऊन जात आहे. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली. सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय? उद्योग महाराष्ट्रात येऊ नये, असे का वागताय? अशी विचारणा शेलार यांनी केली.

"आघाडीची तीन माणसं" बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पॅकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत. खाटा नाहीत, डॉक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत. त्याचे काय ते सांगा, सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला, अशा शब्दांत शेलार यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.

आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख खा. राहुल गांधी यांची सूचना तंतोतंत पाळली. पळकुटी भूमिका आज पण दिसली. काँग्रेस पळुन दाखवतेय. किमान बाकीच्यांनी रडून नको, करून दाखवा. गेली 20 वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात. अँड अनिल परब हा आभास नाही सत्य आहे. आभासी रडू नका, या सत्यावर बोला! मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या, अशा कडक शब्दात शेलार यांनी पलटवार केला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.