ढाका - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. बांगलादेश संरक्षण सचिव अब्दुल्ला अल मोहसीन चौधरी यांचा कोरोनाने सोमवारी मृत्यू झाला. बांगलादेश सरकारने ही माहिती दिली आहे.
ढाका येथील लष्करी रुग्णालयात चौधरी यांनी आज सकाळी 9.30 वाजता अखेचा श्वास घेतला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात 29 मे ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 6 जुन ला त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत खुपच खालावली होती. सचिवालयाचे प्रशासकीय अधिकारी भसानी मिर्झा यांनी ही माहिती दिली.
प्रकृती बिघडल्याने त्यांना 18 जुनपासून व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. चौधरी जानेवारीत संरक्षण सचिव झाले होते. तर 14 जूनला सरकारने त्यांची बढती संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ सचिव पदावर केली होती.
दरम्यान बांगलादेशात आतापर्यंत 1 लाख 37 हजार 787 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 1 हजार 738 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.