ETV Bharat / entertainment

मोठा पडदा गाजवून प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’ ची यशोगाथा येतेय छोट्या पडद्यावर!

author img

By

Published : Jun 15, 2022, 4:43 PM IST

जेव्हा एखादा चित्रपटाला अफाट यश मिळते तेव्हा त्या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान घडलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. ‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरतोय.

प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’
प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादाची यशोगाथा रविवार १९ जूनला दुपारी टीव्हीवर उलगडली जाणार आहे. चित्रपटाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता 'धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे.

'धर्मवीर' चित्रपटासाठी केलेली अपार मेहनत व हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल असं अभिनेता प्रसाद ओक आवर्जून नमूद करतात. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेला हा लोकनेता सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहे, मला आणि माझ्या भूमिकेला मिळलेलं प्रेम त्याचीच पोचपावती असल्याचं ही ते सांगतात.

‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास एका चित्रपटातून मांडणं खूप अवघड काम, पण हा सगळा घाट मी घातला आणि या कलाकृतीच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओजने केल्याने हे शिवधनुष्य पेलल्याचे निर्माते मंगेश देसाई सांगतात.

संगीताच्या माध्यमातून तो काळ आणि एवढया लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा पट उलगडण्यासाठी संगीतकार म्हणून अविनाश-विश्वजीत, चिनार-महेश आणि नंदेश उमप यांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळली.

रविवार १९ जूनला ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.