मुंबई - वर्षीपासून बॉलिवूड सेलेब्रिटींच्या घरी पाळणा हलल्याच्या बातम्या आणि गुड न्यूजच्या बातम्यांनी रकाने भरुन गेले होते. याकाळात बॉलिवूडपासून टीव्ही जगतात अनेक सुंदर जोडप्यांना आई-वडील होण्याचे भाग्य लाभले आहे. गेल्या वर्षभरापासून महिन्यानंतर कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री आई होणार असल्याच्या चांगल्या बातम्या येत आहेत. इतकेच नाही तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लवकरच गुड न्यूज देणार आहेत. अलीकडेच टीव्ही स्टार कपल शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्या घरात पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे.
अभिनेत्री तन्वी ठक्करने मुलाला जन्म दिला - आता आणखी एक टीव्ही कपल तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांचे घर आनंदाने उजळून निघाले आहे. प्रसिद्ध मालिका गम है किसी की प्यार में फेम अभिनेत्री तन्वी ठक्करने मुलाला जन्म दिला आहे. या जोडप्याने आपल्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांना आनंदाची बातमी देत, या जोडप्याने त्यांच्या मुलासोबतचे त्यांचे सुंदर फोटो शेअर केले.
अभिनेत्री इशिता दत्ताने दिली गुड न्यूज - त्याचबरोबर या जोडप्याच्या या सुंदर पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींचे अभिनंदन मेसेजेस येत आहेत. यामध्ये अभिनेता करण ग्रोवर, अभिनेत्री इशिता दत्ता आणि तिचा पती वत्सल सेठ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे, इशिता स्वतः प्रेग्नंट असून ती लवकरच आई होणार आहे. इशिताने लिहिले आहे की, 'मला आमच्या मुलाला प्रेमाने मिठी मारायची आहे आणि यासाठी मी थांबू शकत नाही, तुम्हा सर्वांचे खूप प्रेम असू द्या'.
तन्वी आणि आदित्यने २०१४ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि २०२१ मध्ये लग्न केले आणि स्थायिक झाले. त्याचप्रमाणे लग्नाच्या दुसऱ्या वर्षी दाम्पत्याच्या घरी मुलगा झाला. सध्या, तन्वीने गम है किसी के प्यार में ही मालिका सोडली आहे, हा शो ५ ऑक्टोबर २०२० पासून प्रसारित होत असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे.
हेही वाचा -
१. Ranbir And Alia Date Night: रणबीर कपूर आणि आलिया भट्टची दुबईमध्ये डेट नाईट
३. Rashmika Mandanna : मॅनेजरसोबतच्या भांडणावर रश्मिका मंदान्नाने केला खुलासा...