ETV Bharat / entertainment

सुभाष घई आणि स्वप्नील जोशी आले ‘यासाठी’ एकत्र!

नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स ( OTT Platform ) उदयास आले आणि त्यातीलच एक म्हणजे 1ओटीटी. मराठीचा चॉकोलेट हिरो स्वप्नील जोशी ( Swapnil Joshi ) याने व्यावसायिक नरेंद्र फिरोदिया ( Narendra Firodia ) यांच्यासोबत हा नवीन प्लॅटफॉर्म उदयास आणला आहे. आणि एक पाऊल पुढे जात त्याने शोमॅन सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ ( Whistling Woods International ) सोबत हातमिळवणी केली असून यावर प्रामुख्याने प्रादेशिक कन्टेन्ट बघायला मिळणार आहे.

सुभाष घई आणि स्वप्नील जोशी ओटीटीसाठी एकत्र

author img

By

Published : May 4, 2022, 4:55 PM IST

मुंबई - खरंतर ओटीटी हे माध्यम बरंच नवं आहे. परंतु मोबाईल फोन्स स्मार्ट होत गेले आणि मनोरंजनविश्व लोकांच्या हातात आलं. आजची तरुणाई जागतिक कन्टेन्ट बघायला प्राधान्य देत आली असल्यामुळे हे डिजिटल मिडीयम फोफावले. लॉकडाऊन च्या काळात तर प्रामुख्याने ओटीटी हेच लोकांचे मनोरंजन करीत आल्यामुळे ते अजूनही प्रसिद्ध झाले. अर्थातच त्यामुळे नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स ( OTT Platform ) उदयास आले आणि त्यातीलच एक म्हणजे 1ओटीटी. मराठीचा चॉकोलेट हिरो स्वप्नील जोशी ( Swapnil Joshi ) याने व्यावसायिक नरेंद्र फिरोदिया ( Narendra Firodia ) यांच्यासोबत हा नवीन प्लॅटफॉर्म उदयास आणला आहे. आणि एक पाऊल पुढे जात त्याने शोमॅन सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ ( Whistling Woods International ) सोबत हातमिळवणी केली असून यावर प्रामुख्याने प्रादेशिक कन्टेन्ट बघायला मिळणार आहे.

सुभाष घई आणि स्वप्नील जोशी ओटीटीसाठी एकत्र
सुभाष घई आणि स्वप्नील जोशी ओटीटीसाठी एकत्र

‘डब्ल्यूडब्ल्यूआय’मधील विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपट ‘1ओटीटी’ या विविध भाषांमधील कार्यक्रमांसाठी सुरू केलेल्या व्यासपीठावर प्रदर्शित केले जाणार आहेत. यातील काही चित्रपट हे आजच्या आघाडीच्या दिग्दर्शकांनी ते ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’ शिकत असताना काही वर्षांपूर्वी बनविलेले आहेत. ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’ ही ‘1ओटीटी’ला त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दर्जेदार, अलीकडे तयार झालेले आणि उत्तम करमणूकमुल्ये असलेले चित्रपट उपलब्ध करून देणार आहे. फिरोदिया व जोशी यांच्याबरोबरच या संस्थेला डीटीएल ऍक्टिव्हेशन क्षेत्रातील विनायक सातपुते यांच्याबरोबर संस्थापक सदस्य विनायक श्रीनिवासन, राजीव जनी, प्रख्यात बँकर सतीश उतेकर, करमणूक क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्त्व चेतन मणियार यांचेही मोलाचे पाठबळ आहे.

सुभाष घई या संयुक्त प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाले, “प्रतिभावान अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योगपतील नरेंद्र फिरोदिया यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘1ओटीटी’बरोबर सहकार्य करार करताना मला अतिशय आनंद होत आहे. या संयुक्त भागीदारीतून आम्हाला आमच्या काही अत्यंत प्रतिभावान अशा विद्यार्थ्यांच्या कलाकृती या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यातील काही विद्यार्थी हे आज हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक आहेत.”

ते पुढे म्हणाले, “मी जेव्हा चित्रपट बनवत होतो तेव्हा हिंदी मध्ये बनवायचो पण आता विविध भाषेत चित्रपट बनतात आणि ते चांगला धंदा देखील करतात. त्यामुळे आपल्याला आता कोणत्याही एका भाषेत चित्रपट बनवून चालणार नाही तर तो जास्तीत जास्त भाषेत तयार करावा लागणार आहे आणि हे सिनेमाचे भविष्य आहे. गेल्या वीस वर्षात सिनेमांमध्ये एवढा बदल आलेला आहे जसं काय एक तुफानच आल आहे. जेव्हा मला समजलं माझे मित्र स्वप्निल जोशी यांनी एक असं ॲप बनवलं आहे जे युनिक आहे हे ओटिटी ॲप म्हणजे एक आणि त्याच्या भाषा अनेक आहेत. आपल्या भारतात जरी भाषा अनेक असल्या तरी बोलीभाषा या पाच हजारपेक्षा जास्त आहेत.”

स्वप्नील जोशी म्हणाला, “या सहकार्याबद्दल आम्ही ‘व्हिसलिंग वूड्स’ आणि सुभाष घईजी यांचे खूप खूप आभारी आहोत. ही तर दीर्घकालीन सहकार्याची सुरुवात आहे. आज बॉलीवूडमध्ये ज्यांनी नाव कमावले आहे अशा काही दिग्दर्शकांचे त्यांच्या विद्यार्थीदशेतील चित्रपट पाहण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. हे सर्व चित्रपट हे सर्वप्रकारच्या कलाकृती आहेत आणि ते ‘व्हिसलिंग वूडस’मध्ये शिकत असताना बनविलेले आहेत. प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची एक उत्तुंग अशी मेजवानीच असेल. हे चित्रपट ४ ते ५ भारतीय भाषांमध्ये असून त्यात इंग्रजीचाही समावेश आहे.”

नरेद्र फिरोदिया म्हणाले, “ओटीटी कार्यक्रमासाठी भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे आणि ही बाब गेल्या दोन वर्षांमध्ये सिद्ध झाली आहे. या व्यासपीठावर भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना योग्य असे प्रतिनिधित्त्व मिळत नव्हते आणि त्यामुळेच आम्ही ‘1ओटीटी’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना त्याचा फायदा होणार आहे. आम्हाला आमच्या प्रेक्षकांना भारतीय भाषांमधील दर्जेदार कार्यक्रम द्यायचे आहेत. त्यामुळे हा ओटीटी भारताचा खराखुरा ओटीटी होणार आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’बरोबरच्या या संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही होतकरू आणि सर्वोत्तम प्रतिभा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत.”

‘1ओटीटी’ वर भारतातील सर्व प्रमुख भाषांमधील कार्यक्रम सादर होणार आहेत.त्याद्वारे तो ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’ म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला येत आहे. हा खऱ्या अर्थाने ‘भारताचा ओटीटी’ बनणार असून त्यावर हिंदीबरोबर मराठी, बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट व मालिका सादर होणार आहेत.

हेही वाचा - Eid Celebration : सलमान खानला किस केल्यामुळे शहनाज गिल ट्रोल झाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.