ETV Bharat / entertainment

Koffee with Karan 7 : अक्षय कुमार म्हणाला, "मी त्याच्या अंतिम संस्कारासाठी पैसे देईन" - ऑस्कर होस्ट क्रिस रॉक्स

कॉफी विथ करण 7 च्या तिसऱ्या भागात 'ऊं अंटवा' फेम अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत येणार आहे. यावेळी करणने अक्षयला प्रश्न केला की, जर पूर्वीचा ऑस्कर होस्ट क्रिस रॉक्सने तुझी पत्नी ट्विंकल खन्ना हिची चेष्टा केली असेल तर तू काय करशील? अक्षय कुमारने "मी त्याच्या अंतिम संस्कारासाठी पैसे देईन", "ठीक आहे" असे जोरदार उत्तर दिले.

अक्षय कुमार
अक्षय कुमार
author img

By

Published : Jul 19, 2022, 3:21 PM IST

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करण-7 च्या पहिल्या दोन भागांनी धुमाकूळ घातला असून आता या शोच्या तिसऱ्या भागाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. शोच्या तिसर्‍या एपिसोडमध्ये बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत जोरदार चर्चा रंगणार आहे, कारण यावेळी अक्षय कुमार आणि दक्षिण सिनेमाची नंबर वन अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू या शोमध्ये येत आहेत. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्टने दणका दिला होता आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूड स्टार किड्स सारा अली खान आणि जान्हवी कपूर आली होती.

या शोचे दोन्ही भाग प्रेक्षणीय होते आणि आता तिसर्‍या भागाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की यावेळी साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे होणार आहेत. येथे, सामंथा रुथ प्रभू देखील तिच्या आवडी-निवडीबद्दल सांगणार आहे.

प्रोमोमध्ये करणने अक्षय आणि सामंथा यांना विचारलेल्या एक-दोन प्रश्नांमुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे आणि आता ते शो स्ट्रिम होण्याची वाट पाहत आहेत. करणने अक्षय कुमारला विचारले की, जर पूर्वीचा ऑस्कर होस्ट क्रिस रॉक्सने तुझी पत्नी ट्विंकल खन्ना हिची चेष्टा केली असेल तर तू काय करशील? अक्षय कुमारने "मी त्याच्या अंतिम संस्कारासाठी पैसे देईन", "ठीक आहे" असे जोरदार उत्तर दिले.

जेव्हा करण जोहरने शोमध्ये सामंथाला विचारले की, जर तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडची बॅचलर पार्टी होस्ट करायची असेल, तर तू कोणत्या दोन बॉलीवूड स्टार्सला पार्टीमध्ये डान्स करण्यासाठी घेऊ इच्छितेस, तेव्हा अभिनेत्रीने हा याचे उत्तर देताना म्हणाली की रणवीर सिंग आणि रणवीर सिंग. यावरुन तिला रणवीर सिंग किती आवडतो हे स्पष्ट होते. हा भाग डिस्ने प्लस हॉटस्टारवर २१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होईल.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सामांथाचे आगामी चित्रपट 'शकुंतलम' आणि 'खुशी' आहेत. याशिवाय ती तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. अक्षय कुमारबद्दल सांगायचे तर, 'रक्षा बंधन' व्यतिरिक्त त्याचे 'राम सेतू', 'ओ माय गॉड' आणि 'सेल्फी' चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा - मणिरत्नम यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह, फिल्म इंडस्ट्रीने सोडला सुटकेचा निश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.