ETV Bharat / entertainment

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील भिडे मास्तरच्या निधनाची अफवा; स्वत: लाईव्ह येऊन केले अफवेचे खंडन - Atmaram Tukaram Bhide demise Rumors

तारक मेहता का उलटा चष्माच्या गोकुळधाम सोसायटीमधील एकमेव सेक्रेटरी, ज्याला जेठालालचे वडील चंपकलाल गडा, ‘भिंडी मास्तर’ म्हणून बोलावतात, म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे याच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर प्रेक्षकांचे प्रेम मिळावीत आलाय. मात्र आज त्यांच्या निधनाची अफवा ही सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. या अफवेचे त्याने स्वतः खंडन केले आहे.

Tarak Mehta ka ulta chashma
भिंडी मास्तर
author img

By

Published : May 17, 2022, 7:41 PM IST

Updated : May 17, 2022, 7:53 PM IST

मुंबई - तारक मेहता का उलटा चष्माच्या गोकुळधाम सोसायटीमधील एकमेव सेक्रेटरी, ज्याला जेठालालचे वडील चंपकलाल गडा, ‘भिंडी मास्तर’ ( Bhindi Master ) म्हणून बोलावतात, म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे याच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर प्रेक्षकांचे प्रेम मिळावीत आलाय. पण या कॉमेडी सीरियलमध्ये काम करत असताना त्याला आज आयुष्य कॉमेडी करतेय की काय असे भासले. मनोरंजनसृष्टीत अनेक सेलिब्रिटीजच्या मृत्यूच्या अफवा पसरत असतात. आज मंदार चांदवडकर ( Actor Mandar Chandwadkar ) यांच्या मृत्यूची खबर पसरली आणि टीव्ही विश्वात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अवघ्या ४५ व्या वर्षी निधन म्हणजे त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघातच. परंतु काही वेळाने मंदार चांदवडकर ने स्वतः त्या वृत्ताचे खंडन केले. त्याने समाज माध्यमावर लाईव्ह येत मी जिवंत असल्याचा प्रुफच दिला जणू.

हेही वाचा - Cannes 2022: दीपिका पदुकोणला फॅशनपेक्षा भारतीय चित्रपटांवर अधिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा

त्याने समाज माध्यमावर प्रेक्षकांची संवाद साधत म्हणाला, “नमस्ते! कसे आहेत तुम्ही सगळे? तुमच्या सर्वांचे कामकाज सुरळीत सुरु असेल ही आशा. मीसुद्धा काम करीत आहे. पण अचानक माझ्या मृत्यूची अफवा कोणीतरी पसरवली आणि खूप जणांच्या काळजीपोटी सोशल मीडियावर मी ‘लाईव्ह’ येण्याचा निर्णय घेतला. समाज माध्यमांवर अफवा आगीच्या वेगाने पसरतात. मला सर्वांना खात्री द्यायची होती की मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि मजा करतोय. ज्याने कोणी ही अफवा पसरवली आहे त्याला माझी मनापासून विनंती आहे की कृपया हे थांबव. देव त्याला सद्बुद्धी देवो. माझ्यासकट तारक मेहता का उल्टा चष्माचे कलाकार पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहेत. त्यांची भविष्यात बरीच वर्षे खूप काम करण्याची योजना आहे तसेच प्रेक्षकांना मनोरंजित करण्याचीही.”

Tarak Mehta ka ulta chashma
मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर

हेही वाचा - बेसबॉल सामन्यापूर्वी प्रियंकाने घेतले निक जोनासचे चुंबन - पाहा फोटो

कायदेशीर कारवाईची मागणी - याआधीही टेलिव्हिजन विश्वातील दिव्यांका त्रिपाठी, मुकेश खन्ना, श्वेता तिवारी, शिवाजी साटम सारख्या बऱ्याच कलाकारांच्या निधनाच्या अफवा पसरविल्या गेल्या होत्या. त्या सर्वांना लोकांसमोर येऊन त्या वृत्ताचे खंडन करावे लागले होते. खरंतर अश्या गोष्टी कोण करते हे शोधून काढून त्यांना शिक्षा द्यावयास हवी. अशा वृत्तामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर आणि जवळच्यांवर किती मानसिक आघात होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अश्या अफवेमुळे कोणीतरी मृत्यूच्या जाळ्यात ओढला गेला तर जबाबदार कोण? म्हणूनच मृत्यूच्या अफवा पसरविण्याऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी जेणेकरून भविष्यात अश्या घटना होणार नाहीत. अशी मागणी चाहत्यांनी केली आहे.

mandar_chandwadkar
मंदार चांदवडकर उर्फ आत्माराम तुकाराम भिडे

चांदवडकर म्हणाले - अभिनेता मंदार चांदवडकरने तारक मेहता का उलटा चष्माच्या माध्यमातून तो आणि त्याचे सहकलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करीतच राहतील अशी ग्वाही दिली आहे.

हेही वाचा - Chethana Raj dies during surgery : धक्कादायक! लठ्ठपणावर शस्त्रक्रिया केल्यानंतर कन्नड अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू

Last Updated : May 17, 2022, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.