ETV Bharat / entertainment

बिग बॉस मराठीची स्पर्धक तेजस्विनी लोणारीला रणवीर सिंहने दिल्या जिंकण्यासाठी शुभेच्छा - Ranveer Singh video

लर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथा सध्या खूप चर्चेत आहे. यातील प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी कष्ट घेत आहे. यातील स्पर्धक तेजस्विनी लोणारी हिला बॉलिवूड स्टार रणवीर सिंगने शुभेच्छा देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 25, 2022, 3:52 PM IST

बिग बॉस हा नेहमीच घरातील सदस्यांच्या वागण्यामुळे चर्चेत असतो. आता तो एक बाहेरील व्यक्तीमुळे चर्चेत आहे. ती बाहेरील व्यक्ती म्हणजे बॉलीवूडमधील अत्यंत लोकप्रिय कलाकार रणबीर सिंह. त्याने बिग बॉसच्या घरातील सदस्य तेजस्विनी लोणारीला विशेष शुभेच्छा पाठविल्या आहेत एका खास व्हिडिओ मधून.

रणबीर सिंहने पद्मावतमध्ये अल्लाउद्दीन खिलजी साकारला होता आणि त्याची आताची पत्नी दीपिका पदुकोण हिने राणी पद्मावती ची भूमिका केली होती. दीपिकाच्या आधी पडद्यावर राणी पद्मावती साकारणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी. याच तेजस्विनीला रणवीर ने व्हिडिओ संदेश पाठविला आहे.

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथा सध्या खूप चर्चेत आहे. मग ते टास्क असो, त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो, स्वत: ला सिध्द करण्याच्या प्रयत्नात घरातला प्रत्येक सदस्य आहे. सदस्यांना टास्कपेक्षा देखील कशाची भीती वाटतं असेल तर ती नॉमिनेशनमध्ये येण्याची. नॉमिनेशन पासून कसे दूर रहाता येईल याच्या प्रयत्नात सदस्य असतात.

महाराष्ट्रातील आपले तमाम प्रेक्षक आपल्या लाडक्या सदस्याला वोट करून सेफ करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळे असताना सगळ्या अडचणींवर मात करत घरातील सदस्यांनी आता तब्बल ५० दिवस पूर्ण केले असून त्यांनी खूप महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. त्याच निमित्ताने सगळ्यांचा लाडका रणवीर सिंह याने तेजस्विनी लोणारी साठी खास शुभेच्छा देणारा व्हिडिओ तयार केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसतं आहे.

बिग बॉस मराठीची स्पर्धक तेजस्विनी लोणारी

रणबीर सिंह म्हणाला, "तेजू शुभेच्छा तू (बिग बॉसमध्ये) ५० दिवस पूर्ण केले आहेत... my salam to Mahesh Sir... We miss you ... जीत के आओ हम सब सेलिब्रेट करेंगे"!

हेही वाचा - रोहित शेट्टी व पूजा हेगडेने करुन दिली सर्कस कुटुंबाची ओळख, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.