मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्री मोनिका भदौरिया ही गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आली आहे. तिने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाबद्दल काही खुलासे केले होते. तिने उघडपणे एका मुलाखतीत सांगितले होते की, सेटवर तिचा निर्मात्याद्वारे छळ होत होता. मुलाखतीत मोनिकाने हे देखील पुढे सांगितले होते की, सेटवर राहणे तिच्यासाठी फार त्रासदायक होते. आता पुन्हा एकदा मोनिकाने याबद्दल भाष्य केले आहे. तिने म्हटले की, 'मला फक्त माझा अनुभव आणि मला काय वाटले ते उघड करायचे होते. मला ते माझ्या चाहत्यांसह आणि माध्यमांसोबत शेअर करायचे होते.
मोनिका भदौरिया केला खुलासा : बदला किंवा प्रतिशोध नाही.' होय मला माझ्याशी होणारे चुकीच्या गोष्टी मला समोर आणायच्या होत्या, पुढे तिने म्हटले, या शोद्वारे माझे पुन्हा एकदा या टिव्ही जगतात पदार्पण झाले होते. मी यापुर्वी मी स्टार प्लसवर 'मैंने इस प्यार को क्या नाम दूं' हा शो केला होता. मी या शोमध्ये नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत होते. २०१३ मध्ये हा शो बंद झाला. त्यानंतर मला खूप दिवसानंतर तारक मेहता का उल्टा चष्माची ऑफर आली. मी या शोमध्ये बावरीची भूमिका साकारली आणि या शो ने माझे नक्कीच आयुष्य बदलविले. त्यामुळे हा शो माझ्यासाठी फार मोठा आहे. असे तिने सांगितले.
जेनिफर मिस्त्री बन्सीवालने केले आरोप : यापूर्वी जेनिफर मिस्त्री बन्सीवालने तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तसेच शोचे निर्मात्या व्यतिरिक्त तिने काही कलाकारांवर देखील लैंगिक छळाचे आरोप केले होते. जेनिफरने पोलिस तक्रारीत असा दावा केला आहे की असित मोदीने अनेकदा सेटवर तिच्याशी गैरवर्तन करत होते आणि तिला अनेकदा त्याच्या खोलीत देखील बोलवत होते. याशिवाय तिला खूपदा संदेश पाठवत होते. यातिरिक्त तिने सांगितले की, इतर क्रू मेंबर्स देखील भयानक परिस्थिती आहे. असे तिने तक्रारीत सांगितले होते. दरम्यान शोचे निर्माते, प्रोजेक्ट प्रमुख सोहेल रमाणी, कार्यकारी निर्माते, जतीन बजाज आणि दिग्दर्शकांच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करून सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यांनी असे म्हटले होते की जेनिफर हे सर्व सूडबुद्धीने करत आहे कारण तिचा प्रॉडक्शन हाऊससोबतचा कामाचा करार हा समाप्त झाला आहे.
हेही वाचा :