मुंबई - सध्या वेब सिरीज खूप मोठ्या प्रमाणात बनताना दिसत आहेत. आधी ओटीटीला नाकं मुरडणारे देखील या प्लॅटफॉर्म वर झळकताना दिसताहेत. चित्रपटांपेक्षा सखोल पद्धतीने इथे भूमिका साकारता येत असल्यामुळे अनेक कलाकार या माध्यमाचा उपयोग करताना दिसताहेत. चित्रपटांमध्ये फारशा संधी न मिळाल्यामुळे बरेच कलाकार आपली कला दर्शविण्यासाठी या माध्यमाचा आसरा घेताना दिसतात. फक्त कॉमेडी करणारा कलाकार असा शिक्का बसलेला अभिनेता मनीष पॉलने सुद्धा आता डिजिटल प्लॅटफॉर्मचे दरवाजे खटखटावले आहेत. मनीष पॉल ओटीटी पदार्पण करीत असून त्याची प्रमुख भूमिका असलेली वेब सिरीज 'रफुचक्कर' लवकरच जियो सिनेमा वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
तसं बघायला गेलं तर सुरुवातीला मनीष पॉल सूत्रसंचालनात रमला होता. त्याचे विनोदी टायमिंग अफलातून असून याआधीच्या जुगजुग् जियो मध्ये देखील त्याने कियारा अडवाणीच्या भावाची विनोदी ढंगाची भूमिका साकारली होती. एक सच्चा कलाकार असल्याने त्यालाही वाटत होते की त्याला विविधांगी भूमिका मिळाव्यात आणि तो तश्या प्रयत्नांतही होता. आता जिओ स्टुडिओज ची आगामी वेब सिरीज रफुचक्कर मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार असून नुकताच या सिरीजचा टीझर रिलीज करण्यात आला असून त्याचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. रफुचक्कर या वेब सिरीजमध्ये मनीष पॉल पाच भूमिका साकारताना दिसणार असून विविध पाच लूक्समध्ये दिसणार आहे.
आपल्या पहिल्या वेब सिरीज मध्ये अभिनेता मनीष पॉल ठकास महाठक ही युक्ती वापरताना दिसणार आहे. तो वेगवेगळ्या पाच वेशांत दिसणार असून त्याने मनोरंजनात कमतरता ठेवली नाहीये. अष्टपैलुत्व व्यक्तिमत्त्व असलेल्या मनीष ने फिटनेस तज्ञ, जाडजूड वृद्ध, पंजाबी वेडिंग प्लॅनर, सरदार आणि एक सामान्य माणूस या व्यक्तिरेखा पेश केल्या आहेत. प्रेक्षकांना तो याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. तसेच परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा तो यात ॲक्शन करतानाही दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये मनीष पॉल व्यतिरिक्त प्रिया बापट, अक्षा परदासनी, सुशांत सिंग आणि शिरीन सेवानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'रफुचक्कर' ची निर्मिती जियोच्या ज्योती देशपांडे आणि जीसिम्सच्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी केली असून तिचे दिग्दर्शन केले आहे रितम श्रीवास्तव यांनी. ही वेब सिरीज येत्या १५ जून रोजी जियो सिनेमा (JioCinema) वर रिलीज होईल.