ETV Bharat / entertainment

डिसेंबर 2023 मध्ये ओटीटीवरील प्रमुख आकर्षणे : द आर्चीज, कडक सिंग, रिबेल मून, मॅस्ट्रो होणार प्रवाहित

Major attractions on OTT in December 2023:यंदाच्या वर्षाचा अखेर होत असताना 2023 च्या डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांना भरपूर मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी 'डंकी', 'सालार', 'अ‍ॅनिमल', 'सॅम बहादूर' यासारख्या चित्रपटांचं आकर्षण आहे. तसंच ओटीटीवरही अनेक चित्रपट आणि नव्या वेब मालिकांची रेलचेल डिसेंबरमध्ये असणार आहे. या महिन्यात कोणते नवे चित्रपट आणि वेब सिरीज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहेत यावर एक नजर टाकूयात.

Major attractions on OTT in December 2023
डिसेंबर 2023 मध्ये ओटीटीवरील प्रमुख आकर्षणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 12:58 PM IST

मुंबई - Major attractions on OTT in December 2023: 2023 च्या अखेरच्या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रवाहित होणार आहेत. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना भरपूर मनोरंजनासह डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये झोया अख्तर दिग्दर्शित आणि स्टार किड्सचे पदार्पण असलेला द आर्चीज, अक्षय कुमार स्टारर मिशन राणीगंज, पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका असलेला कडक सिंग, म्युझिकल थ्रिलर चमक, द क्राउन सीझन 6 चा दुसरा भाग अशी खास आकर्षणं आहेत. दिग्दर्शिका झोया अख्तरकडे 'खो गए हम कहाँ'च्या रूपानं डिसेंबरमध्ये रिलीज होणारा आणखी एक प्रोजेक्ट असणार आहे. ही तीन मित्रांची डिजिटल-कहाणी आहे.

Major attractions on OTT in December 2023
अक्षय कुमार स्टारर मिशन राणीगंज

अक्षय कुमार स्टारर मिशन राणीगंज

नेटफ्लिक्सवर 1 डिसेंबरपासून

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अलिकडेच उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या 41 मजूरांची सुखरुप सुटका करण्यात बचाव पथकाला मोठं यश आलं होतं. अशाच प्रकारची घटना 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे घडली होती. यावर अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला मिशन राणीगंज हा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रवाहित झाला आहे. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरपूर कौतुक केलंय.

नागा चैतन्य स्टारर 'धूथा' वेब सिरीज

अ‍ॅमेझॉन प्राईमवर 1 डिसेंबरपासून

साऊथ अभिनेता नागा चैतन्य यानं 'धूथा' या वेब सीरिजमधून डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलंय. 1 डिसेंबर रोजी त्याची 'धूथा' ही वेब सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करताना नागानं त्याच्या पोस्टमध्ये लिहलं होतं, 'खूप रहस्ये आणि सत्याच्या शोधात एक माणूस'. या वेब सीरिजचा ट्रेलर खूप दमदार आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आठ भागांच्या या वेब सीरिजमध्ये पार्वती थिरुवोथू, प्रिया भवानी शंकर आणि प्राची देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

द आर्चीज

झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'

नेटफ्लिक्सवर 7 डिसेंबर पासून

झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज हा म्यूझिकल चित्रपट नेटफ्लिक्सवर 7 डिसेंबर रोजी प्रवाहित होणार आहे. 'द आर्चीज' हा एक नव्या युगाचे संगीत असलेला आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन यांच्या आयुष्यातील एक काव्यमय कथा असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा रिव्हरडेल या काल्पनिक डोंगराळ शहरात घडताना प्रेक्षक पाहणार आहेत. या चित्रपटातून प्रेम, मैत्री, स्वातंत्र्य आणि बंडखोरी याचा शोध चित्रपटात घेतला जाणार आहे.

जगभरात गाजलेल्या लोकप्रिय कॉमिक्सच्या भारतीय रूपांतरात आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत अगस्त्य नंदा, बेटी कूपरच्या भूमिकेत खुशी कपूर, नेहमी भुकेल्या जुगहेड जोन्सच्या भूमिकेत मिहिर आहुजा, सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत आणि युवराज मेंडा डिल्टन डोईलीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

म्यूझिकल थ्रिलर 'चमक'

सोनी LIV 7 डिसेंबरपासून

'चमक' ही म्युझिकल थ्रिलर असलेली मालिका एका तरुण रॅपर कालाभोवती गुंफण्यात आली आहे. कॅनडातून एक युवक पंजाबला येतो आणि एका दिग्गज गायकाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पंजाबी संगीत उद्योगात पाऊल ठेवतो, असं याचं कथानक आहे. त्याच्या या मार्गात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना तो कसा करतो हे पाहणं रंजक असणार आहे. परमवीर सिंग चीमा, मनोज पाहवा, मोहित मलिक, ईशा तलवार, मुकेश छाबरा, प्रिन्स कंवलजीत सिंग, सुविंदर (विकी) पाल आणि आकासा सिंग यांच्या या वेब सिरीजमध्ये भूमिका आहेत.

पंकज त्रिपाठी स्टारर कडक सिंग

ZEE5 वर 8 डिसेंबरपासून

अभिनेता पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका असलेला कडक सिंग हा चित्रपट झी 5 वर 8 डिसेंबरपासून प्रवाहित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन पिंक अँड लॉस्ट फेमचे अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे. यात पंकज त्रिपाठी पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसेल. 'कडक सिंग' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची कहाणी खूप रहस्यमय असेल. गोव्यात झालेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'कडक सिंग' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. यात पार्वती तिरुवोथु आणि संजना संघी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

क्राउन सीझन 6 भाग 2

क्राउन सीझन 6 भाग 2

नेटफ्लिक्स 14 डिसेंबर रोजी

राणी एलिझाबेथ II च्या जीवनावर आणि कारकिर्दीवर आधारित द क्राउनचा सहावा आणि शेवटचा सीझन नेटफ्लिक्सवर दोन भागमध्ये प्रदर्शित होत आहे. चार एपिसोौड्सचा पहिला भाग 16 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज झाला होता. आता प्रवाहित होणारा दुसऱ्या भागात सहा एपिसोड्स आहेत. 14 डिसेंबर रोजी प्रवाहित होणारा हा अंतिम हंगाम 8 सप्टेंबर 2022 रोजी राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर तयार करण्यात आला आहे. राणी एलिझाबेथ II च्या 1947 मधील लग्नापासून ते 21 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या कारकिर्दीचे वर्णन क्राउनमध्ये पाहायला मिळते. या मालिकेत प्रिन्स फिलिपच्या भूमिकेत जोनाथन प्राइस, राजकुमारी मार्गारेटच्या भूमिकेत लेस्ली मॅनव्हिल, प्रिन्स चार्ल्सच्या भूमिकेत डोमिनिक वेस्ट, प्रिंसेस ऍनीच्या भूमिकेत क्लॉडिया हॅरिसन, टोनी ब्लेअरच्या भूमिकेत बर्टी कार्वेल, मोहम्मद अल फैद यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

द फ्रीलांसर द कन्क्लुजन

डिस्ने + हॉटस्टार 15 डिसेंबर रोजी

मोहित रैनाची मुख्य भूमिका असलेल्या थ्रिलर वेब सिरीज द फ्रीलांसर द कन्क्लुजनचा उर्वरित भाग १५ डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल. भाव धुलिया दिग्दर्शित मालिकेच्या पहिल्या भागात मोहित रैना साकारत असलेला अविनाश कामथ सीरियातून आलियाला परत आणण्यासाठी बचाव मोहिमेवर गेला होता. ही मालिका शिरीष थोरात यांच्या 'ए टिकिट टू सीरिया' या पुस्तकावर आधारित असून यामध्ये अनुपम खेर यांचीही महात्त्वाची भूमिका आहे.

रिबेल मून भाग 1

रिबेल मून भाग 1

नेटफ्लिक्सवर 15 डिसेंबर रोजी

रेबेल मून हा अमेरिकन एपिक स्पेस ऑपेरा चित्रपट आहे ज्याचं दिग्दर्शन झॅक स्नायडर यांनी कर्ट जॉनस्टॅड आणि शे हॅटन यांच्यासोबत लिहिलेल्या पटकथेवरून केलं आहे. या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सोफिया बुटेला, चार्ली हुनम, मिशेल ह्यूझमन, डिजीमन हौन्सौ, डूना बे, रे फिशर, क्लियोपात्रा कोलमन, जेना मेलोन, फ्रा फी, एड स्क्रिन आणि अँथनी हॉपकिन्स यांचा समावेश आहे.

मॅस्ट्रो

नेटफ्लिक्सवर 20 डिसेंबर रोजी

'ए स्टार इज बॉर्न' या 2018 च्या ऑस्कर-नामांकित चित्रपटानंतर 'मॅस्ट्रो' चित्रपटाचे ब्रॅडली कूपर दुसऱ्यांदा दिग्दर्शन करत आहेत. कूपरने साकारलेली “निर्भय प्रेमकथा” लिओनार्ड बर्नस्टीनच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट त्याची पत्नी फेलिसिया मॉन्टेलेग्रेसोबत त्याच्या जीवनाला फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी मॅस्ट्रो चित्रपटाचं दिग्दर्शन मार्टिन स्कॉर्सेस करणार होते. परंतु नंतर याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ब्रॅडली कूपर यांच्यावर सोपवण्यात आली.

BTS Monuments : बियॉन्ड द स्टार

डिस्ने + हॉटस्टारवर 20 डिसेंबर

कोरियन बॉय बँड BTS ने यावर्षी आपला 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. या प्रसंगी डिस्ने+ हॉटस्टार बँड सदस्य असलेला आरएम, जिन, सुगा, जे होप जीमिन, व्ही आणि जंग यांच्या मुलाखती, परफॉर्मन्स आणि पडद्यामागील क्षणांचा समावेश असलेली 8 भागांची डॉक्युमेंटरी मालिका तयार करण्यात आली आहे. ही मालिका कोरियन बँडच्या 10 वर्षांच्या रंजक कारकिर्दीवर प्रकाश टाकेल.

व्हाट इफ ...?

डिस्ने + हॉटस्टारवर 22 डिसेंबर

व्हाट इफ ...? या नावाच्या मार्वल कॉमिक्स मालिकेवर आधारित, डिस्ने+ या स्ट्रीमिंग सेवेसाठी ए.सी. ब्रॅडली यांनी तयार केलेली अमेरिकन अॅनिमेटेड अँथॉलॉजी मालिका आहे. मार्व्हल स्टुडिओद्वारे निर्मित मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मधील ही चौथी मालिका आहे आणि मार्व्हल स्टुडिओ अॅनिमेशनमधील स्टुडिओची पहिली अ‍ॅनिमेटेड मालिका आहे. ब्रायन अँड्र्यूज दिग्दर्शित ही मालिका 22 डिसेंबरपासून प्रवाहित होईल.

खो गये हम कहाँ

नेटफ्लिक्सवर डिसेंबर 26 रोजी

'खो गए हम कहाँ' हा अर्जुन वरिन सिंग दिग्दर्शित चित्रपट नेटफ्लिक्सवर 26 डिसेंबर रोजी दिसले. अर्जुन वरण सिंग, झोया अख्तर, रीमा कागती यांनी सह-लिखित आणि एक्सेल एंटरटेनमेंट बॅनरखाली रितेश सिधवानी, झोया अख्तर, रीमा कागती आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती केली आहे. या चित्रपटात आदर्श गौरव, सिद्धांत. चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि रोहन गुरबक्सानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे शीर्षक बार बार देखो (2016) मधील याच गाण्याच्या शीर्षकावर आधारित आहे.

हेही वाचा -

  1. प्रभासच्या सालारचा ट्रेलर रिलीज, उत्कंठा वाढवणाऱ्या दृष्यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

2. 'आजचा दिवस 'सालार'चा' म्हणत प्रभास फॅन्सचा निर्मात्यांनी वाढवला उत्साह

3. 'भाजपाकडून निवडणूक लढवणार' बातमीचं कंगना रणौतनं केलं खंडन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.