मुंबई - 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका लोकप्रियतेच्या कळसावर आहे. याचे शूटिंग दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई येथे सुरू असते. यासाठी एक भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटच्या परसिरातच मालिकेसाठी आवश्यक प्राणीही राहात असतात. काल रात्री या मालिकेच्या सेवरील मेकअपरुम, एडिट रुम आणि ऑफिसपर्यंत थेट बिबट्या घुसला होता. याची थरारक दृष्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
दोन मेकअपरुमच्या मध्ये एक भिंत आहे. या भिंतीवरील विटा बिबट्याने पाडल्या व थेट आतमध्ये प्रवेश केला. ही घटना शुटिंग संपल्यानंतरची आहे. मेकअपरुम व ऑफिसमध्ये यावेळी कोणीही नव्हते. मात्र बाजूलाच एका रुममध्ये नवीन जन्मलेली कुत्र्यांची पल्लं होती. कदाचित त्यांच्या वासानेच बिबट्या आत शिरला असावा.
कॅमेऱ्यामधील दृष्यात बिबट्या आत प्रवेश केलेला दिसतो. शिकारीच्या शोधात आलेला हा बिबट्या मेकअपरुम, एडिट रुम व ऑफिस बाहेर फिरताना दिसतो. सावजावर हमला करण्याच्या पवित्र्यात असलेल्या या बिबट्याला नवीन जन्मलेली कुत्र्यांचीची पिल्लं सापडत नाहीत. या सेटवरील केअर टेकरने ही पिल्लं बंद खोलीत ठेवल्यामुळे ती वाचली.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेचे निर्माता संतोष अयाचित यांनी आज त्यांच्या फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी सांगितलं की बिबट्या या परिसरातील वावर नित्याचाच आहे. हा बिबट्यांचा परिसर आहे, त्यामुळे ते अधून मधून दर्शन देत असतात. मालिकेच्या सेटवर गायी, बैलं, घोडा, शेळ्या, मेंढ्या, बकरी, श्वान अशा सुमारे २१ प्रकारचे प्राणी राहात असतात. त्यांची देखभाल मालिकेच्या वतीने केअर टेकर घेत असतो.
बाळू मामाच्या सेटवर दोन महिन्यापूर्वी बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यावेळी सेटवरील लोकांनी बिबट्याला हुसकावून लावले होते. पण या हल्ल्यात खंडू नावाचे पिल्लू गंभीर जखमी झाले होते. पंरतु लवकर उपचार न मिळाल्याने या पिल्लाचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - सिध्दू मुसेवालाच नाही...तर या पंजाबी कलाकारांचीही झाली होती दिवसा ढवळ्या हत्या