मुंबई - सुपरस्टार सलमान खान बिग बॉस 16 च्या आगामी भागामध्ये मजा मस्ती करताना दिसणार आहे. बिग बॉसचा हा वीकेंड का वार अधिक मनोरंजक बनवण्यासाठी, कॅटरिना कैफ तिच्या फोन भूत सहकलाकार ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसह सेटवर पोहोचली होती.
कलर्स टीव्हीने लेटेस्ट एपिसोडचे अनेक प्रोमो रिलीज केले ज्यामध्ये कॅटरिना होस्ट सलमानसोबत चांगला टाईम घालवताना दिसत आहे. एका प्रोमोमध्ये सलमानने कॅटरिनाला सांगितले की, जर तो एखाद्या दिवशी भूत बनला तर त्याला तिचा नवरा, अभिनेता विकी कौशलची हेरगिरी करायला आवडेल.
कॅटरिनाने सलमानला विचारले की तो भूत बनला तर कोणाची हेरगिरी करायला आवडेल. यावर सलमानने उत्तर दिले, "एक बंदा है उसका नाम विक्कू कौशल है.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पतीचे नाव ऐकताच कॅटरिनाचे गाल लाजेने लालबूंद झाले. तिने कारण विचारले असता, सलमान म्हणाला, "लविंग है, केअरिंग है या डेअरिंग है. उसके बारे में बात करता हू तो आप ब्लशिंग हैं." सलमानचे उत्तर ऐकून कॅटरिनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
बिग बॉसच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये कॅटरिना आणि सलमानही टिप टिप बरसा पानी गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर, सलमान आणि कॅटरिनाला त्यांच्या चाहत्यांसाठी पुढील वर्षी दिवाळीची खास भेट आहे कारण त्यांचा 'टायगर 3' नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - आपली भविष्यवाणी खरी होत असल्याचा कंगना रणौतचा दावा