मुंबई - dating reality show Temptation Island : टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सातत्यानं नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न असतो. शो हिट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते त्यातील प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं मनोरंजन मुल्य. ते अधिकाधिक खुलवण्यासाठी, रंजकता वाढवण्यासाठी शोच्या होस्टवर मोठी जबाबदारी असते. अशीच नवी जबाबदारी अभिनेत्री मौनी रॉय आणि करण कुंद्रा घेणार आहेत. ही जोडी होस्ट करत असलेला 'टेम्पटेशन आयलंड' हा अमेरिकन डेटिंग रिअॅलिटी मालिकेची भारतीय आवृत्ती होस्ट करताना दिसणार आहे.
शोबद्दल बोलताना मौनी रॉय म्हणाली, 'प्रलोभन ही मानवी जीवनातील अनंत काळापासूनची संकल्पना आहे. अॅडम आणि इव्हच्या निषिद्ध फळापासून ते भगवान विष्णूच्या मोहिनी अवतारापर्यंत, देव देखील यापासून वाचू शकले नाहीत. आम्ही तर अजूनही मानव आहोत.'
'टेम्पटेशन आयलंड' हा शो मौनी रॉय करण कुंद्रासोबत होस्ट करणार आहे. यासाठी उत्साही असलेल्या करणने शेअर केलं की, 'व्यक्तिगतरित्या हा शो पाहण्याचा आनंद घेतल्यानं, मला पूर्णपणे विश्वास आहे की भारतीय प्रेक्षकांसाठी ही एक चटपटीत आणि फ्रेश करणारी अनोखी संकल्पना आहे. याची संकल्पना इतर रिअॅलिटी शोपेक्षा संपूर्ण वेगळी आहे. हा एक रोमांचक प्रवास आहे जिथे जोडप्यांना त्यांच्या प्रेमाची ताकद आजमावण्यासाठी समस्या आणि चाचणी घेण्याची इच्छा उघडपणे समोर येते. एकट्यानं समस्यांवर चर्चा करण्याऐवजी, ही जोीपे उघडपणे त्यांच्या आव्हानांना तोंड देतात की त्यांचं प्रेम त्यांच्या इच्छांवर मात करू शकते का नाही ते पाहण्यासाठी.'
'टेम्पटेशन आयलंड' या अमेरिकन शोची भारतीय आवृत्ती ३ नोव्हेंबरला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
2. Tejas Box Office Collection Day 2: कंगना रणौत स्टारर 'तेजस' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ...
3. Ananya And Aditya : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनर डेटवर झाले स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल...