मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यानं तयार केलेल्या आणि गायिका-गीतकार फाल्गुनी शाह (फालू) यांनी त्यांच्या पतीसह सादर केलेल्या 'अबंडन्स इन मिलेट्स' या बाजरीवरील गाण्याला ग्रॅमी पुरस्कार 2024 साठी नामांकन मिळालंय. सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीत या गाण्याला नामांकन मिळालं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
बाजरीचे फायदे सांगणारं प्रचार गीत - पीएम मोदींनी ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकन गायिका फालू यांच्यासोबत बाजरीचे फायदे आणि जागतिक भूक कमी करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा प्रचार करण्यासाठी एका खास गाणे तयार करण्यासाठी सहकार्य केलं होतं. 16 जून रोजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 'अबंडन्स इन मिलेट्स' हे गाणं प्रदर्शित झालं होतं.
आंतरराष्ट्रीय मिलेट इयर - 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट इयर म्हणून निवडण्यात आलं होतं. यासाठीचा संयुक्त राष्ट्र समितीकडे भारताच्या वतीने पंतप्रधान मोदींनी प्रस्ताव सादर केला होता. युनायटेड नेशन आणि अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) नियामक मंडळाच्या सदस्यांनी या प्रस्तवाला 75 व्या अधिवेशनाद्वारे मान्यता दिली होती
ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीतील इतर नामांकनं - ग्रॅमी पुरस्कार 2024 साठी नामांकन मिळालेल्या इतरांमध्ये अरुज आफताब, विजय अय्यर आणि शहजाद इस्माइली यांना 'शॅडो फोर्सेस' या गाण्यासाठी, 'अलोन'साठी बर्ना बॉय, 'फील' साठी डेव्हिडो, 'मिलाग्रो वाय डिझास्ट्रे' या गाण्यासाठी सिल्व्हाना एस्ट्राडा आणि बेला फ्लेक, एडगर मेयर आणि झाकीर हुसेन व राकेश चौरसिया यांचा 'पश्तो' या गाण्यासाठी आणि इब्राहिम मालोफचा 'टोडो कलर्स' गाण्यासाठी समावेश झाला आहे.
'अबंडन्स इन मिलेट्स' गाण्याच्या निर्मितीत मोदींचं योगदान - भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह आणि तिचे पती गौरव शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खास गाण्याच्या निर्मितीसाठी विशेष योगदान दिलंय. या गाण्यात पीएम मोदींनी लिहिलेले आणि दिलेले भाषण देखील आहे. फाल्गुनी शाह यांच्या वेबसाइटवरील निवेदनानुसार जागतिक भूक कमी करण्यासाठी आणखी एक संभाव्य गुरुकिल्ली म्हणून सुपरग्रेनबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी हे विशेष गाणे तयार करण्यात आलंय.
हेही वाचा -
3. Koffee With Karan 8: सलमान खानमुळे सीझनचा अखेर होणार संस्मरणीय, जोडीदाराचा शोध जारी