मुंबई - हल्लीच्या काळात नेहमीच्या वागण्यात मानसशास्त्राचा उपयोग जास्त प्रमाणात होताना दिसतो. पूर्वी चांगलं किंवा वाईट वागणं लगेच समजून येत नसे. परंतु हल्ली मनुष्याच्या वागण्यातील सकारात्मकता वा नकारात्मकता लगेच ध्यानात येते. समोरच्याच्या वागण्यातील चांगले वाईट संकेत समजले की आपले जगणे सुकर होते. वागण्याच्या प्रक्रियेतील गुड वाईब्स आणि बॅड वाईब्स ओळखणे हे एकाद्याशी मैत्री अथवा व्यवहार करताना उपयोगी पडतात. मराठी वेब सिरीज मध्ये चाकोरीबाहेरील विषयांना हात घातला जातोय आणि आधुनिक काळातील महत्त्वाचे असणाऱ्या गुड वाईब्स आणि बॅड वाईब्स वर आधारित एक नवीन वेबफिल्म बनली आहे जिचे नाव आहे 'गुड वाईब्स ओन्ली'.
'गुड वाईब्स ओन्ली' हा वेब चित्रपट प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. प्रत्येक चित्रपटाच्या कथानकात चांगली आणि वाईट कॅरॅक्टरस् असतातच. हा चित्रपट त्याहीपेक्षा दोन पावले पुढे जाणार असून चित्रपटांच्या पात्रांच्या मनातील सायकॉलॉजीकल भावनांचे विश्लेषण करताना दिसेल. हे ऐकायला अथवा वाचायला क्लिष्ट वाटत असले तरी त्याची मांडणी खुसखुशीतपणे केली असून सर्वकाही मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आले आहे. गुड वाईब्स ओन्ली या चित्रपटाची कथा दोन स्पोर्ट्सप्रिय व्यक्तिंभोवती फिरणारी असून सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतलेली आहे. या खेळावर बनणारी ही पहिलीच फिल्म असावी.
'गुड वाईब्स ओन्ली' या नावावरूनच समजून येते की ही सकारात्मकतेने भरलेली फिल्म असेल जी प्रस्तुत केली आहे सिल्क लाईट फिल्म्स ने. याची निर्मिती आणि दिग्दर्शन जुगल राजा यांचे असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. चित्रपटाची कथा देखील जुगल राजा यांनीच लिहिली आहे. चित्रपटात नवीन कलाकार असून आरजे श्रवण अजय बने आणि गायिका आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपापल्या क्षेत्रात नाव कमाविल्यानंतर श्रवण आणि आरती आता अभिनयक्षेत्रात पदार्पण करीत आहेत.
आयुष्यातील सकारात्मकता उलगडून दाखवण्यासाठी 'गुड वाईब्स ओन्ली' ही वेब फिल्म लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणारआहे.
हेही वाचा -
२. Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नाचा कॅज्युएल अवतार, विमानतळावर झाली क्लिक
३. Sonu Sood : सोनू सूदचा 'संकल्प', देणार मोफत कायदा प्रशिक्षण!