ETV Bharat / entertainment

Flickr Movie : प्रेमाची खरी अनुभूती देणारा व प्रेमाचा अनुबंध उलगडणारा चित्रपट ‘फ्लिकर’ - फ्लिकर चित्रपट

‘फ्लिकर’ चित्रपटाच्या माध्यमातून राजवीर सरकार तन्वी किशोर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांसोबत सयाजी शिंदे, संजय मोने, समीर चौघुले, शुभांगी लाटकर हेही दिसणार आहे.

Flickr  Movie
Flickr Movie
author img

By

Published : Apr 5, 2022, 12:59 PM IST

Updated : Apr 5, 2022, 1:19 PM IST

मुंबई : अशक्य नसलेले शक्य करून दाखवण्याची ताकद प्रेमात असते. हे दाखवून देणारा सत्यघटनेवर आधारित ‘फ्लिकर’ हा चित्रपट प्रेमाची खरी अनुभूती प्रेक्षकांना देतील असा विश्वास निर्माते व्यक्त करतात. आशयपूर्ण कथा आणि त्याचं तेवढंच आकर्षक शीर्षक हे कुठल्याही चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचं. हटके टायटल आणि प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा ‘फ्लिकर’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘फ्लिकर’ चित्रपटाच्या माध्यमातून राजवीर सरकार तन्वी किशोर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांसोबत सयाजी शिंदे, संजय मोने, समीर चौघुले, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरुण कदम, गौरव रोकडे, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, पूर्णिमा अहिरे, सायली जाधव, प्रतीक्षा शिर्के, किशोर नांदलस्कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत.

चित्रपटाची कथा दमदार
चित्रपटाची पटकथा-संवाद जय अत्रे, मंदार चोळकर, अमोल पाडावे, समीर सामंत यांनी लिहिले आहेत. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना शान, बेनी दयाल, मोहम्मद इरफान या हिंदीतील गायकांनी स्वरसाज दिला आहे. या चित्रपटाचे छायांकन उदयसिंग मोहिते तर संकलन आशीष म्हात्रे यांनी केले आहे. महेश पावसकर असोसिएट दिग्दर्शक आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी संदीप काळे यांच्याकडे आहे. प्रशांत राणे हे कला दिग्दर्शक आहेत. निर्मिति प्रबंधक गुनाशेखरन तंघवेल आहेत.
हेही वाचा - Bharti Singh blessed with baby boy : कॉमेडियन भारती सिंहला झाले पुत्ररत्न

Last Updated : Apr 5, 2022, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.