मुंबई : बीटबॉक्सिंग आणि बासरीवादक जोडी दिव्यांश आणि मनूराज सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ च्या ९व्या सिझन चे विजेते ठरले आहेत. वयाचे बंधन नसलेल्या या रियालिटी शो ने ‘गजब देश का अजब टॅलेंट’ या ‘टॅग लाईन’ नुसार वैविध्यपूर्ण टॅलेंट प्रेक्षकांसमोर सादर केले. याच्या ‘ग्रँड फिनाले’ मध्ये एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्सेस बघायला मिळाले. या शोचे जजेस किरण खेर, शिल्पा शेट्टी कुंद्रा, मनोज मंटशिर आणि बादशाह यांनीसुद्धा स्टेजवर सुंदर परफॉर्मन्सेस केले. सूत्रसंचालक अर्जुन बिजलानीला साथ देण्यासाठी गायिका-कॉमेडियन सुंगंध मिश्रा मंचावर आली होती आणि दोघांनी खूप मजामस्ती करत सर्वांचे मनोरंजन केले.
![India's got talent](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-indias-got-talent-winners-divyash-manuraj-mhc10001_18042022005243_1804f_1650223363_121.jpeg)
हिरोपनती
दिव्यांश आणि मनूराज हे खरंतर आधीपासून एकमेकांना ओळखत होते. परंतु इथे येऊन एकत्र काम करू असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांच्या जुगलबंदी सर्वांना रोमांचित करीत असत आणि सर्वात जास्त वेळा त्यांनी ’गोल्डन बझर’ मिळविला होता. त्यांनी त्यांच्या परफॉर्मन्सेसनी ‘गजब देश का अजब टॅलेंट’ ही उक्ती सत्यात उतरवली. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ च्या या महासोहळ्यात ’हिरोपंती २’ चे कलाकार, टायगर श्रॉफ, तारा सुतारीया आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा - Smita Tambe ride Bullock Cart : ‘लगन’ मधील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी स्मिता तांबेने स्वत: चालवली बैलगाडी