ETV Bharat / entertainment

Smriti Irani Denies Allegation : स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटला अवैध बार परवान्याबद्दल नोटीस; इराणींने आरोप फेटाळले

author img

By

Published : Jul 23, 2022, 2:03 PM IST

Updated : Jul 23, 2022, 5:35 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे बार चालवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

कॅबिनेट मंत्री स्मृती इराणीं
कॅबिनेट मंत्री स्मृती इराणीं

मुंबई - केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी अभिनेत्री तिच्या कामामुळे नाही तर तिची मुलगी जोश इराणीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. वास्तविक, स्मृती यांची मुलगी गोव्यात सिली सोल नावाचा कॅफे बार (रेस्टॉरंट) चालवते. कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे बार चालवल्याबद्दल उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस चिकटवली आहे. कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने हा बार चालवला जात आहे त्या व्यक्तीचा गेल्या वर्षी (2021) मृत्यू झाला आहे.

  • An 18-year-old child, a college student... her character was assassinated by Congressmen at party headquarters. Her fault is that her mother fought Lok Sabha elections against Rahul Gandhi from Amethi in 2014 & 2019: Union Min Smiti Irani denies her daughter runs an illegal bar pic.twitter.com/rFOsP6cGyZ

    — ANI (@ANI) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण - गेल्या महिन्यातच बारच्या परवान्याचे नूतनीकरण झाले असताना ही बाब उघडकीस आली. अर्जावर परवानाधारकाची नसून अन्य कुणाची स्वाक्षरी आढळून आली आहे, असेही नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत स्मृतीच्या कन्येवर लायसन्ससाठी फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये हेराफेरीचे आरोप झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे. परवाना नूतनीकरण अर्ज 22 जून 2022 रोजी अँथनी डीगम नावाने करण्यात आला होता, तर रेकॉर्डनुसार या व्यक्तीचा मे 2021 मध्ये मृत्यू झाला आहे.

मीडियानुसार, तक्रारदार वकील रॉड्रिग्स यांनी आरटीआयद्वारे या प्रकरणातील कागदपत्रे जारी केली आहेत. वकिलाचे म्हणणे आहे की मंत्र्याची मुलगी आणि कुटुंबीयांनी मिळून उत्पादन शुल्क अधिकारी आणि स्थानिक पंचायतीने केलेली हेराफेरी सर्वांसमोर उघड झाली पाहिजे. वकिलाचे म्हणणे आहे की अबकारी नियमांनुसार बार किंवा रेस्टॉरंटच्या मालकालाच बार परवाना दिला जातो.

केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी या दोन मुलांची (जोहर आणि जोश) आई आहेत. नुकतेच स्मृती यांचा मुलगा जोहरने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यावेळी स्मृती यांनी मुलाच्या दीक्षांत समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्मृती यांच्या छोट्या पडद्यावरील कामाबद्दल सांगायचे तर, टीव्ही क्वीन एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत तुलसीची भूमिका साकारून त्या घराघरात लोकप्रिय झाल्या होत्या.

हेही वाचा - गायक राहुल देशपांडे यांनी राष्ट्रीय पुरस्कार आजोबांना केला समर्पित

स्मृती इराणी यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर - एक 18 वर्षांची मुलगी, कॉलेजची विद्यार्थिनी... तिची चारित्र्यहनन काँग्रेसवाल्यांनी केले जात आहे. 2014 आणि 2019 मध्ये तिच्या आईने (स्मृती इराणी) राहुल गांधींविरुद्ध अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवली हा तिचा दोष आहे? असा सवाल स्मृती इराणी यांनी काँगेसला विचारला आहे. तसेच माझी मुलगी बेकायदेशीर बार चालवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Jul 23, 2022, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.