ETV Bharat / entertainment

Sonali Phogat Passes Away भाजप नेत्या, अभिनेत्री सोनाली फोगट यांचे गोव्यात निधन

author img

By

Published : Aug 23, 2022, 10:26 AM IST

Updated : Aug 23, 2022, 1:24 PM IST

Sonali Phogat
सोनाली फोगट

10:25 August 23

BJP leader and actress Sonali Phogat died last night of heart attack in Goa

पणजी भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे काल रात्री गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या काही कर्मचाऱ्यांसह गोव्याला गेल्या होत्या. भाजपने सोनाली फोगट यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. हरियाणातील भाजपच्या महिला मोर्चाच्या त्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये शोकलहर पसरली आहे.

सोनाली फोगट यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनालीने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 14 व्या सीझनमध्ये त्या सहभागी होत्या. सलमान खानसोबत त्यांनी केलेले नृत्य गाजले होते. त्यांनी मागील विधानसभा निवडणूक आदमपूर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात भाजप उमेदवार म्हणून लढवली होती. आगामी पोटनिवडणुकीत आदमपूरमधून भाजपच्या तिकीटासाठी त्या दावेदार असल्याचा दावा करत असतानाही, कुलदीप बिश्नोई गेल्या आठवड्यात त्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले होते.

सोनाली फोगाट यांचे नॉर्थ गोव्यातील अँटेनी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गोव्याचे पोलीस महासंचालकांनी त्यांच्या मृत्यू नेमके काय कारण आहे ते पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आल्यानंतरच सांगू शकू असे सांगितले आहे दरम्यान गोवा पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Last Updated : Aug 23, 2022, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.