मुंबई - बिग बॉस मराठीच्या घरात ऐरव्ही शांत आणि गोंधळलेला दिसणारा प्रसाद आज मात्र भलताच रागात दिसणार आहे. घराचा कॅप्टन अक्षय आणि प्रसादचा तुफान राडा होणार हे शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघे एकमेकांना मारायला धावून जात आहेत असे दिसून आले. घरातील सदस्य त्यांना थांबण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रसाद अक्षयला म्हणाला, ''स्वतः जेवलायस ना, आमच्या भुकेचे काय ?'' अक्षय म्हणाला, ''कॅप्टन काय जेवायला भरवेल आता ?'' अक्षय म्हणाला,'' घेऊन जा ह्याला...'' प्रसाद म्हणाला, ''कोणाच्या बापाचा नोकर आहे का तो ?'' हे ऐकताच अक्षयला राग अनावर झाला तो म्हणाला, ''बापावर जाऊ नकोस...'' प्रसाद म्हणाला, ''हात उचलास तर हात उचलण्याच्या लायकीचा नाही रहणार, एक मारेन तुला अशी....'' बघूया हे भांडणं अजून किती वाढलं आणि पुढे काय घडलं... हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - Manoj Bajpayee's Mother Passes Away : मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे निधन