ETV Bharat / entertainment

Actress Accident Death :  शुटिंगवरून परतताना प्रसिद्ध अभिनेत्रीला ट्रकने चिरडले; जागीच सोडले प्राण - सुचंद्र दासगुप्ताचा अपघाती मृत्यू

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता हिचा काल एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. शूटींगवरून परतत असताना तिच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने धडक दिली, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

Suchandra Dasgupta
सुचंद्रा दासगुप्ता
author img

By

Published : May 21, 2023, 7:02 PM IST

Updated : May 21, 2023, 7:12 PM IST

कोलकाता : बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता हिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री कोलकात्याच्या बाहेरील बारानगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. अभिनेत्रीच्या अपघाताचे वृत्त समजताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून या घटनेने बंगाली मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

असा झाला अपघात : सुचंद्रा दासगुप्ता कोलकाताच्या उत्तर भागात शूटिंग करत होती. काम संपवून ती मोटारसायकलवरून घरी परतत होती. तेवढ्यात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने तिच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की अभिनेत्री खाली पडून जागीच ठार झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. पोलिसांना येथील अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कोण होती सुचंद्रा दासगुप्ता? : सुचंद्रा दासगुप्ता बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने अनेक बंगाली मालिकांमध्ये काम केले आहे. 'गौरी' या मालिकेतील अभिनयामुळे ती खूप प्रसिद्ध झाली होती. बंगाली टीव्ही इंडस्ट्रीत तिची लोकप्रियता खूप जास्त होती. त्यामुळेच तिच्या अश्या अपघाती निधनामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुचंद्रा एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच तिच्या सतत हसतखेळत राहणाऱ्या स्वभावासाठी देखील ओळखली जात होती.

पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला : सुचंद्राच्या अपघातानंतर स्थानिकांनी विरोध सुरू केला. त्यामुळे काही काळ वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ट्रकचालकाला अटक करून त्याचा ट्रक जप्त केला आहे.

हे ही वाचा :

  1. Voice of Dilip Prabhalkar : बोक्या सातबंडे नाटकातील दिलीप प्रभावळकरांचा आवाज बालप्रेक्षकांचे करतोय भरपूर मनोरंजन
  2. Grand launch of Jai Shri Ram : आदिपुरुष चित्रपटातील जय श्री राम गाण्याचे भव्य लॉन्च, अजय अतुलचा लाइव्ह परफॉर्म्न्स
  3. Ibrahim Ali Khans debut film : इब्राहिम अली खान बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, शुटिंग पूर्ण झाल्याचा साराचा खुलासा

Last Updated : May 21, 2023, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.