मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण याला यावर्षी पहिल्यांदाच वडील झाल्याचा आनंद मिळाला. आदित्यच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. खुद्द आदित्यने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. तेव्हापासून गायकाचे चाहते त्याच्या मुलीच्या एका झलकची वाट पाहत होते. आता आदित्य नारायण यांनी तीन महिन्यांनी मुलीचा चेहरा दाखवला आहे.
आदित्य नारायणने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. गायकाने मुलीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची मुलगी लहान टोपलीप्रमाणे असलेल्या पाळणामध्ये दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करत आदित्य नारायण यांनी लिहिले आहे, 'तीन महिन्यांची मुलगी, आमची परी'.
आदित्य नारायण यांच्या मुलीचे नाव त्वषा आहे. मुलगी दोन महिन्यांची असताना एका फोटोसह या जोडप्याने याचा खुलासा केला होता. उदित नारायण आणि त्यांच्या पत्नीने वेळोवेळी चाहत्यांना गरोदरपणाचे फोटो शेअर करून अपडेट्स दिले होते.
यापूर्वी आदित्य म्हणाला होता, ''श्वेता आणि मी आमच्या आयुष्याच्या या नव्या सुरुवातीची वाट पाहत आहोत, ही एक पूर्णपणे वेगळी अनुभूती आहे, मला नेहमीच मुलांची खूप आवड आहे आणि मला कधीतरी वडील व्हायचे होते.''
''आता, श्वेताला अधिक काम करावे लागेल, कारण मी लहान मुलापेक्षा कमी नाही, आम्ही नुकतेच एक खोडकर गोल्डन रिट्रीव्हर देखील स्वीकारला आहे. आमचे घर लवकरच ऑक्टेन उर्जेने फुलणार आहे.'', असेही तो म्हणाला होता.
हेही वाचा - Cannes 2022 : रणवीर सिंग कान्समध्ये दाखल, दीपिका पदुकोणसह शेअर केले फोटो