ETV Bharat / entertainment

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी साकारणार ‘सावित्री’ ची भूमिका! - Actress Vedangi Kulkarni in Satyawan Savitri

झी मराठीने आता ‘सत्यवान सावित्री’ ची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी
अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी
author img

By

Published : Jun 2, 2022, 4:40 PM IST

सध्या पौराणिक मालिकांची चलती आहे. अनेक वाहिन्यांवर एक तरी पौराणिक मालिका सुरु असून त्यांना प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबाही मिळतोय. झी मराठीने आता ‘सत्यवान सावित्री’ ची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सत्यवानावरील असिम प्रेमामुळे यमदेवांशी कुशलतेने संवाद साधण्याचं धैर्य सावित्रीच्या ठायी आलं. तिच्यातील कलागुणांनी तिला सामान्यातून असामान्य घडवलं. तिची ही प्रेरणादायी गोष्ट तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने झी मराठी वाहिनीने ही कथा दैनंदिन मालिकेतून सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.

वेदांगी कुलकर्णी साकारणार ‘सावित्री’ ची भूमिका!

या मालिकेचे प्रोमोज नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. या मालिकेत सावित्रीची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना होती, त्याचं उत्तर देखील प्रेक्षकांना नुकतंच वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या प्रोमोज मधून मिळालं. या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी सावित्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेत सावित्रीची बालपणापासूनची कथा दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत बालपणीच्या सावित्रीची भूमिका राधा धरणे साकारणार असून वेदांगी या मालिकेत तरुणपणीच्या सावित्रीची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसेल. वेदांगीने या आधी अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या असून ती एक नृत्यांगना देखील आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमामधून वेदांगी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी
अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी

या मालिकेबद्दल बोलताना वेदांगी म्हणाली, "ही मालिका म्हणजे गोष्ट आहे यमाकडून सत्यवानाचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची आणि ती प्रमुख भूमिका माझ्या वाट्याला आली याचा मला खूप आनंद आहे. सावित्रीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पण तिचा जीवनप्रवास नाही माहिती. ही मालिका खूपच भव्यदिव्य रूपात तिचा जीवनप्रवास प्रेक्षकांना दाखवेल. प्रेक्षकांना ही कथा पाहायला खूप आवडेल याची मला खात्री आहे."

हेही वाचा - दिग्दर्शक एटली कुमारच्या आगामी चित्रपटात 'नयनतारा'सोबत झळकणार शाहरुख खान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.