ETV Bharat / entertainment

अप्रतिम अभिनेत्री-नृत्यांगना सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा परिक्षिकेच्या भूमिकेत! - गश्मीर महाजनी बरोबर सोनाली कुलकर्णी

डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. पण त्याच्या जोडीला अजून एक हरहुन्नरी अभिनेत्री परिक्षिकेची भूमिका निभावणार आहे. दुसरी परीक्षक असणार आहे महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी. या कार्यक्रमासाठी अप्रतिम डान्सर-अभिनेता गश्मीर महाजनी बरोबर आता अभिनेत्री-नृत्यांगना सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा परिक्षिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
author img

By

Published : Jul 16, 2022, 5:08 PM IST

मुंबई - नुकतंच प्रेक्षकांना कळलं की डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. पण त्याच्या जोडीला अजून एक हरहुन्नरी अभिनेत्री परिक्षिकेची भूमिका निभावणार आहे. दुसरी परीक्षक असणार आहे महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी. झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमासाठी अप्रतिम डान्सर-अभिनेता गश्मीर महाजनी बरोबर आता अभिनेत्री-नृत्यांगना सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा परिक्षिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला सोनाली कुलकर्णीच उत्तम नृत्यकौशल्य नवीन नाही. सोनाली कुलकर्णी ही परीक्षकाच्या भूमिकेसाठी योग्य आहे यात काही वादच नाही. गश्मीर-सोनाली ही परीक्षकांची जोडी लिटिल मास्टर्सना उत्तम मार्गदर्शन करतील याबद्दल शंकाच नाही. या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढतेय.

या कार्यक्रमातील आपल्या परीक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, "डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या परीक्षकाची भूमिका निभावण्याची जबाबदारी मला मिळाली आहे याचा मला आनंद आहे. डान्स रिऍलिटी शो सोबत माझं नातं खूप आधीपासून आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक डान्स रिऍलिटी शो करताना मला खूप आनंद होतोय. त्याचसोबत या कार्यक्रमात लहान स्पर्धक असणार आहेत त्यामुळे मी खूप उत्सुक आहे कारण आताची पिढी ही खूपच जास्त टॅलेंटेड अहे. त्यामुळे त्यांचं परीक्षण करणं हे आम्हाला सोपं जाईल असं मला अजिबात वाटत नाही. हा कार्यक्रम खूपच रंजक असणार अहे कारण याचा फॉरमॅट देखील थोडा वेगळा आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे."

हेही वाचा - अभिनेत्रींनाही लाजवणाऱ्या 'ललित मोदी'ची मुलगी आलियाचे भारदस्त फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.