मुंबई - Zeenat Aman nickname : झिनत अमानने तिच्या पाळीव श्वानाचा फोटो शेअर केल्यानंतर तिनं स्वतःच्या टोपण नावामागची रंजक कथा सांगितली आहे. तिला टोपण नावही देव आनंद यांनीच दिलं होतं. देव आनंद तिला कोणत्या नावानं हाक मारत असतं याचाही खुलासा झीनत अमाननं केलाय.
झीनत अमाननं बुधवारी इंस्टाग्रामवर एक दीर्घ चिठ्ठी लिहून पांढर्या पोशाखातील स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. 'तिनं चिठ्ठीत लिहिलंय की, लहानपणीची टोपण नावं चिकटलेली असतात. एक लहान मुलगी म्हणून मी माझ्या वडीलांच्या डोळ्यांची बाहुली होते. त्यांचा स्वभाव मिश्कील विनोदी होता कारण आणि ते मला बाबूशा या नावानं हाक मारत असत. बाबूष्का आणि बाबूघोषा यांच्यातील नावातील मध्यातून ते नाव तयार झालं होतं. हे नाव एका रशियन वृद्ध स्त्रीच्या संदर्भातील आहे. बाबूघोषा नावाचा संदर्भ पेर या पेरुसारख्या दिसणाऱ्या फळाशी संदर्भित आहे. असं नाव मुलींना देणं ही दुर्मिळ बाब आहे. माझ्या लहानपणीचे मित्र आणि त्यांच्या आई वडीलानी हे नाव उचलून धरले. त्यांच्या तोंडून बाबुशा हे बेब्स प्रमाणे विकसीत झालं. त्यामुळे माझे सर्वात जुने मित्र अजूनही मला याच नावानं ओळखतात', असं झीनतनं सांगितलं.
झीनत अमानला देव आनंद यांनी दिलं होतं टोपण नाव - दिवंगत अभिनेता देव आनंद तिला काय नावानं हाक मारत असत याचाही खुलासा तिनं केला. झीनत अमान पुढे म्हणाली की, 'नंतर अर्थातच, देव साब मला 'झीनी' म्हणून हाक मारु लागले आणि नंतर मीडियाने मला 'झीनी बेबी' बनवले. ही दोन्ही नावं माझ्यासोबत जोडली गेली. आता मी म्हातारी झालीय त्यामुळे यापैकी नावानं मला तरुण हाक मारत नाहीत, ते मला झी किंवा ZA म्हणत असतात. घरातून मिळालेलं टोपण नाव यात प्रेम आणि जवळीकीचे एक अद्भुत लक्षण आहे. मी वडीलांच्या पुस्तकातलं एक पान घेतलंय. माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या जन्मानंतर लगेचच टोपन नावं मिळाली. मोठ्याचं अझांचू आणि धाकट्याचं झानुस्की. जर तुमच्याकडे एखादे विचित्र किंवा मजेदार किंवा अनोखं प्राण्याचं नाव असंल, तर मला त्यामागील गोष्टी मला कमेंटमध्ये ऐकायला आवडेल!'
झीनत अमाननं पोस्ट शेअर करताचा त्यावर कमेंटचा पाऊस सुरू झाला. लगेचच काजोलने रेड हार्ट इमोजी टाकले. तर एका युजरनं लिहिलं, तुम्ही आमच्यासाठी नेहमीच 'झीनी बेबी' असाल. 70 च्या दशकातील एक मूल आणि 80 च्या दशकातील एक किशोर म्हणून माझ्यासाठी, तुम्ही ग्लॅमरचे प्रतीक आहात!
हेही वाचा -
2. Leo Trailer Day: 'लिओट्रेलरडे' एक्सवर होतोय ट्रेंड; पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव