ETV Bharat / entertainment

ZHZB Collection Day 6 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या कमाईवर सर्वांचे लक्ष... - जरा हटके जरा बचके

'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने 30 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाला 6व्या दिवशी प्रेक्षकांचा फार कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या हा चित्रपट पुढे किती कमाई करेल यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

ZHZB Collection Day 6
जरा हटके जरा बचकेचे 6 दिवसाचे कलेक्शन
author img

By

Published : Jun 8, 2023, 12:32 PM IST

मुंबई: अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके'ने 8 जून रोजी बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला आहे. तसेच या चित्रपटाची सहाव्या दिवसाची कमाई ही समोर आली आहे. पहिल्या दिवशी 5 कोटींहून अधिक कमाई करणारा हा चित्रपट 6 दिवसांत आपल्या चित्रपटाचा खर्चही वसूल करू शकला नाही आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन आता 30 कोटींहून अधिक झाले आहे मात्र हे बजट 35 कोटींपेक्षा कमी आहे.

चित्रपटाची सहाव्या दिवसाची कमाई : या चित्रपटाने सहाव्या दिवशी 7 जूनला जगभरात 3.51 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे आणि देशांतर्गत सिनेमाने 2.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 34.11 कोटींवर गेली आहे. आता एका आठवड्याच्या कलेक्शनमध्ये हा चित्रपट आपला खर्च वसूल करू शकेल का, हे बघणे फार महत्वाचे ठरणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईसह, चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.49 कोटी जगभरात आणि 3.35 कोटी देशांतर्गत , दुसऱ्या दिवशी 7.20 कोटी जगभरात आणि 4.55 कोटी देशांतर्गत, 9.90 कोटी जगभरात आणि 5.78 कमाई कोटी तिसर्‍या दिवशी तसेच चौथ्या दिवशी देशांतर्गत 4.14 कोटी जगभरात 2.40 कोटी , पाचव्या दिवशी देशांतर्गत 3.87 कोटी जगभरात 2.27 कोटी आणि 6 व्या दिवशी देशांतर्गत, 3.51 कोटी 2.05 कोटी जगभरात कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 34.11 कोटींवर गेली आहे

चित्रपटाची कथा? : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट एका मध्यमवर्गीय विवाहित जोडप्यावर कपिल-सोम्या आधारित आहे. हे नवविवाहित जोडपे संयुक्त कुटुंबात राहत असून त्यांना प्रायव्हसी मिळत नसल्याने दोघेही नाराज होतात. शिवाय त्यांना एक स्वत;चे घर सरकारी योजनेद्वारे पाहिजे असते त्यामुळे दोघे घटस्फोट घेण्याचे प्रयत्न करत असतात. या चित्रपटाची कहाणी जरा हटकेच आहे. या चित्रपटात ड्रामा कॉमेडी या गोष्टी पाहयला मिळेल. हा चित्रपट कुटुंबासह सिनेमागृहात प्रेक्षक पाहू शकतात. तसेच हा चित्रपट फार मनोरंजक आहे.

हेही वाचा :

  1. Naga Chaitanya : नागा चैतन्य स्टारर 'कस्टडी' हा चित्रपट ओटीटीवर 'या' तारखेला होणार प्रदर्शित...
  2. Sonnalli Seygall wedding : गुपचूप लग्न करून अभिनेत्री सोनली सेगल अडकली लग्नबंधनात
  3. Citadel action training in Serbia : वरुण धवन आणि सिकंदर खेर सिटाडेलसाठी सर्बियामध्ये घेतायत कठोर प्रशिक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.