ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2' रिलीज होईल 'या' दिवशी - हृतिक रोशन

War 2 Release Date Announcement : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2'ची रिलीज डेट आज 29 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट कधी रिलीज होईल हे जाणून घेण्यासाठी वाचा.

War 2 Release Date Announcement
वॉर 2 रिलीज डेट घोषणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 2:56 PM IST

मुंबई War 2 Release Date Announcement : 'वॉर 2' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे. हृतिक रोशनचा हा चित्रपट 2025 साली प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील दिसेल. हृतिक, कियारा आणि ज्युनियर एनटीआरचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. यशराज बॅनरचा हा चित्रपट देशभक्तीपर असेल. 'वॉर 2'च्या रिलीजसाठी निर्मात्यांनी 14 ऑगस्ट 2025 ही तारीख निश्चित केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करून 'वॉर-2'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. काही लोक या चित्रपटाच्या रिलीज डेटवर खूश नाहीत.

चाहते झाले नाराज : तरण आदर्शच्या या पोस्टवर कमेंट करताना काही युजर्सनी निराशा व्यक्त करत लिहिलं, 'अरे यार! याचा अर्थ सलमान खान आणि शाहरुख खान यांचा 'टायगर' वर्सेस 'पठाण' हा चित्रपट 2025 साली प्रदर्शित होणार नाही. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, 'हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज करा आणि 2025 मध्ये'टायगर वर्सेस पठान' रिलीज करा.' आणखी एका यूजरनं लिहिलं की, 'हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र पाहणं मजेशीर असेल.'

'वॉर 2' चित्रपटाबद्दल : 'वॉर' चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' या चित्रपटानं जगभरात 475 कोटींची कमाई केली होती. 'वॉर' या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं होतं, ज्यांनी शाहरुख खानसोबत 'पठाण' निर्मित केली. 'वॉर 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी केलं आहे. 'वॉर 2' चित्रपटाद्वारे हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर फेब्रुवारी 2024 मध्ये पहिल्यांदा एकत्र शूट करणार आहेत.

यशराज स्पाय युनिव्हर्स : 'वॉर 2' हा यशराज स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे. याआधी 'एक था टायगर',' टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'टायगर 3' हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई केली. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूरची पत्नी म्हटल्यानंतर आलिया भट्टचे चाहते पापाराझीवर भडकले
  2. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवणाऱ्या पथकाचे सेलेब्रिटींनी मानलं आभार
  3. 'अ‍ॅनिमल' विरुद्ध 'सॅम बहादूर': अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत रणबीर कपूरच्या चित्रपटानं मारली बाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.