ETV Bharat / entertainment

Sunny Deol And Shah Rukh Khan : सनी देओल-शाहरुख खानमधील वाद १६ वर्षानंतर मिटला, नेमक काय घडलं? - शाहरुख खान आणि शाहरुख खान

Sunny Deol And Shah Rukh Khan : सनी देओलनं शाहरुख खानसोबतच्या भांडणावर खुलासा केला आहे. सनी हा 16 वर्ष शाहरुखशी बोलला नाही. दरम्यान 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीला आमंत्रित करून त्यानं या वादाला पूर्णविराम दिला आहे.

Sunny Deol And  Shah Rukh Khan
सनी देओल आणि शाहरुख खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 4:31 PM IST

मुंबई Sunny Deol And Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' च्या यशामुळं चर्चेत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' नं 500 कोटीहून अधिक कमाई केली आहे. सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्री आणि वैर याबद्दल बहुतेकांना प्रश्न पडतो. सनीचे आता शाहरुख खानसोबतचे अनेक वर्षापासूनचे जुने मतभेदही दूर झाले आहेत. दरम्यान 1993 मध्ये आलेल्या 'डर' चित्रपटाच्या सेटवर सनी देओल आणि शाहरुख खानचं मतभेद झालं होतं. त्यानंतर सनी 16 वर्ष शाहरुखशी बोलला नाही. 'डर'च्या क्लायमॅक्सशी सहमत नसल्यामुळं दिग्दर्शक यश चोप्रासोबत त्याचा मोठा वाद झाला. सनीला सेटवर इतका राग आला की त्यानं आपल्या जीन्सच्या खिशात मुठ घालून फाडली होती. या सर्व वादानंतर यश चोप्रा चांगलेच अस्वस्थ झाले.

सनी देओल आणि शाहरुख खानचा वाद : गेल्या आठवड्यात सनी देओलनं शाहरुख खानला 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीला आमंत्रित करूनच या वादाला पूर्णविराम दिला. या कार्यक्रमामधील अनेक शाहरुख खान आणि सनी देओलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. सनी आणि किंग खान एका व्हिडिओमध्ये मिठी मारताना दिसले. या प्रकरणी बोलताना सनीनं एका कार्यक्रमात सांगितलं, ते 'बालपण' होते आणि आज त्याचं आणि शाहरुखसोबतच चांगलं नातं आहे. याआधीही अनेकवेळा बोलणं झालं असून अनेक गोष्टींवर चर्चा देखील झाल्याचं त्यानं सांगितलं.

'गदर 2'नं केली बॉक्स ऑफिसवर कमाई : 'गदर 2' बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा 2001 च्या 'गदर: एक प्रेम कथा'चा सीक्वल आहे. 'गदर 2'मध्ये सनी देओलसोबत अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा देखील आहेत. तर मनीष वाधवाने यात खलनायकाची भूमिका साकारली आहे. याशिवाय गौरव चोप्रा, लव सिन्हा आणि सिमरत कौर यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 11 ऑगस्टला रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. आता सध्या 'जवान' प्रदर्शित झाल्यामुळं चित्रपटाच्या कमाई थोडी घसरण झाली आहे.

हेही वाचा :

  1. Shahrukh Khan Funny Reply : 'जवान' चित्रपटाबाबत शाहरुख खाननं दिला चाहत्याला सल्ला...
  2. Anurag Kashyap Birthday : अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपनं दिल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...
  3. Riteish Deshmukh Poll : भारत, इंडिया की हिंदुस्थान, रितेश देशमुखनं घेतला देशाच्या नावांबद्दल पोल; चाहत्यांची पसंती...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.