ETV Bharat / entertainment

Year Ender 2022: यंदा सर्वाधिक हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री - Bollywood actress

२०२२ मध्ये भारतातील सर्वच सिने उद्योगात भरपूर सिनेमांची निर्मिती झाली आणि कोटी कोटीची उड्डाणेही झाली. यात जितका मोठा वाटा अभिनेत्यांचा होता तितकाच तो अभिनेत्रींचाही होता. व्यावसायिकदृष्ठ्या यशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींवर एक नजर टाकूयात.

Year Ender 2022
Year Ender 2022
author img

By

Published : Dec 26, 2022, 11:41 AM IST

Updated : Dec 26, 2022, 3:21 PM IST

मुंबई - 2022 हे वर्ष उत्तम कामगिरीचे आणि बॉक्स ऑफिसवरील मोठ्या आकड्यांचेही होते. 'KGF Chapter 2' आणि 'RRR' यांसारखे अनेक पुरुष अभिनेत्यांची मुख्य भूमिका असलेले चित्रपट मोठे हिट ठरले, तर अनेक महिला कलाकारही होत्या ज्यांनी 2022 मधील सर्वात मोठा हिट चित्रपट दिले. यंदा बॉक्स ऑफिसवर कमाल केलेल्या अभिनेत्री कोण होत्या हे वाचा.

1. आलिया भट्ट

आलिया भट्ट
आलिया भट्ट

अनेकजण २०२२ ला आलियाचे वर्ष म्हणतात -- तिचे लग्न झाले, तिला एक मुलगी झाली आणि या सगळ्यावरकढी म्हणजे तिने २०२२ चे सर्वात मोठे हिट चित्रपट दिले.

आलियाने संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' मध्ये भूमिका केली. या चित्रपटाने जगभरात सुमारे 203 + कोटी रुपये कमवले.

आलिया 'ब्रह्मास्त्र: भाग 1 शिवा' मध्ये देखील मुख्य भूमिकेत होती, जो बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. त्यानंतर तिचा ओटीटी रिलीज 'डार्लिंग्स'चीही बरीच चर्चा झाली. आणि, मेगा-ब्लॉकबस्टर 'RRR' मधील तिची भूमिका तर संस्मरणिय ठरली.

2. तब्बू

तब्बू
तब्बू

तब्बूने या वर्षी दोन जबरदस्त हिट चित्रपट दिले - भूल भुलैया २ आणि दृश्यम २. भूल भुलैया 2 ने जगभरात सुमारे 263+ कोटी रुपयांची कमाई केली आहे तर दृष्यम 2 ने आतापर्यंत जगभरात 298+ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

3. त्रिशा कृष्णन

त्रिशा कृष्णन
त्रिशा कृष्णन

त्रिशा कृष्णन ही मणिरत्नमच्या मॅग्नम ओपस 'PS-1' मधील लीड्सपैकी एक होती ज्याने जगभरात 500+ कोटी रुपये कमवले.

4. ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्याचे मेगा कमबॅक म्हणून ओळखला जाणारा, 'PS 1' यी चित्रपटातून ती पुन्हा एकदा दिग्दर्शक मणिरत्नमसोबत झळकली.

जगभरात 500+ कोटींचा व्यवसाय केल्यानंतर, चित्रपटाने लाखो लोकांना, विशेषतः ऐश्वर्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले जे रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते.

5. कियारा अडवाणी

कियारा अडवाणी
कियारा अडवाणी

कियाराने या वर्षी तीन चित्रपट केले - भूल भुलैया 2, जुग जुग जीयो आणि गोविंदा नाम मेरा. भूल भुलैया 2 ने जगभरात सुमारे 263+ कोटी रुपयांची कमाई केली तर जग जुग्ग जीयोने देखील चांगली कामगिरी करून जगभरात सुमारे 132+ कोटी रुपयांची कमाई केली. गोविंदा नाम मेरा एक ओटीटी रिलीज होता आणि त्याला ऑनलाइन चांगले पुनरावलोकने मिळत आहेत. आगामी वर्षात कियाराकडे अनेक चित्रपट असून सध्या ती एक सर्वात बिझी अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.

हेही वाचा - Year Ender 2022: या वर्षी सर्वात मोठे व्यावसायिक हिट्स देणारे १० अभिनेते

Last Updated : Dec 26, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.