ETV Bharat / entertainment

Stars meet PM Narendra Modi : यश, ऋषभ शेट्टी, श्रद्धा जैनसह कन्नड स्टार्सनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट - PM Narendra Modi

एरो इंडिया 2023 आणि इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन करण्यासाठी बेंगळुरूला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्नड चित्रपट उद्योगातील प्रमुख व्यक्तींची भेट घेतली. केजीएफ स्टार यश, कांतारा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि होंबळे फिल्म्सचे विजय किरागांडूर मोदींसोबत भेट आणि अभिवादन करण्यात आले होते.

Stars meet PM Narendra Modi
Stars meet PM Narendra Modi
author img

By

Published : Feb 13, 2023, 6:10 PM IST

बेंगळुरू - केजीएफ स्टार यश, कंतारा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि कॉमेडियन श्रद्धा जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे भेट घेतली. तसेच होंबळे फिल्म्सच्या कंतारा चित्रपटाचे निर्माते विजय किरगांडूर आणि दिवंगत कन्नड चित्रपट स्टार पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार हेदेखील पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या वेळी अभवादनासाठी हजर होते. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांनीही त्यांच्या कुटुंबीयांसह मोदींची भेट घेतली.

  • ಕ್ರಿಕೆಟ್‌ ಆಟದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಛಾಪು ಮೂಡಿಸಿ ದೇಶಕ್ಕೆ ಕೀರ್ತಿ ತಂದ ಕರ್ನಾಟಕದ ಹೆಮ್ಮೆಯ ಕ್ರೀಡಾ ಸಾಧಕರು ಅವರ ಕುಟುಂಬದವರೊಂದಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಶ್ರೀ @narendramodi ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾದರು. pic.twitter.com/a4lznA5dOU

    — BJP Karnataka (@BJP4Karnataka) February 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

होंबळे फिल्म्सच्या अधिकृत हँडलने पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. सुंदर फोटोंच्या मालिकेसोबतचे कॅप्शन असे लिहिले आहे: नवीन भारत आणि प्रगतीशील कर्नाटकाला आकार देण्यासाठी आम्ही मनोरंजन उद्योगाच्या भूमिकेवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणादायी भेट घेतली. #BuildingABetterIndia मध्ये योगदान दिल्याचा अभिमान आम्हाला वाटतो.

कन्नडमधील सर्वाधिक यशस्वी निर्मिती संस्था होंबाळे फिल्म्स - होंबाळे फिल्म्स ही कन्नड चित्रपटसृष्टीतील आजच्या घडीला आघाडीवरील चित्रपट निर्मिती संस्था आहे. अभिनेता यश याच्या केजीएफची निर्मिती होंबाळे फिल्म्ससाठी मैलाचा दगड ठरला. केजीएफचा पहिला चित्रपट प्रचंड यश देऊन गेला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागासाठी अत्यंत खडतर परस्थितीत कलाकार आणि दिग्दर्शकच्या मागे होंबाळे फिल्म्स उभी राहिली. त्यामुळेच केजीएफने १००० कोटींची कमाई करुन बाहुबली चित्रपटाच्या कमाईशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गेल्या वर्षाच्या अखेरीस अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याला घेऊन कंतारा या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटानेही कमाल दाखवली आणि आता या चित्रपटाचा प्रीक्वेल बनवण्याची योजना आकाराला येत आहे.

हिट प्राइम व्हिडिओ मालिका पुष्पवल्ली आणि सोशल कॉमेडी फीचर डॉक्टर जी मधील तिच्या कामासाठी ओळखल्या जाणार्‍या श्रद्धा जैन हिने सोमवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर पंतप्रधानांसोबत फोटो शेअर केला. नमस्कार, होय, मी आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांना भेटले. त्यांचा माझ्यासाठी पहिला शब्द होता अय्यो!'. मी डोळे उगाच मिचकावत नाही, हे माझे ओ माय जोड आहे, ते खरोखरच तसं म्हणाले, हे खरोखर घडत आहे!!!!' धन्यवाद पीएमओ इंडिया!, असे तिने पोस्टला कॅप्शन दिले.

दरम्यान, एरो इंडिया 2023 आणि इंडिया पॅव्हिलियनच्या 14 व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी बेंगळुरूमध्ये होते. तत्पूर्वी आज पंतप्रधानांनी येलाहंका येथील एअरफोर्स स्टेशनवर आशियातील सर्वात मोठ्या एरो शो - एरो इंडिया 2023 च्या 14 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मरणार्थ तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. 'एक अब्ज संधींची धावपट्टी' या थीमवर पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भारताची एरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांमधील वाढ प्रदर्शित केली जाईल. (एजन्सी इनपुटसह)

  • Namashkar, yes, I met the Honorable Prime Minister of our Country. His first word to me was ‘Aiyyo!’.
    I am not blinking, that’s my ‘O My Jod, he really said that, this is really happening!!!!’ look. Thank you @PMOIndia! pic.twitter.com/zBYexcy1I2

    — Aiyyo Shraddha (@AiyyoShraddha) February 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Pathaan Box Office Day 19: किंग खानच्या पठाणचा थिएटरमध्ये धुमाकूळ, एक हजार कोटीकडे घोडदौड सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.