मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांना 20 वर्षीय 'कौन बनेगा करोडपती 14' ( Kaun Banega Crorepati 14 ) ची स्पर्धक आणि कंटेंट रायटर वैष्णवी कुमारी यांनी त्यांची नात आराध्या बच्चनसोबत ( Aaradhya Bachchan ) कसा वेळ घालवता असा प्रश्न केला होता.
यावर अमिताभ यांनी उत्तर दिले, "मी तिच्याबरोबर जास्त वेळ घालवू शकत नाही. मी सकाळी 7 - 7:30 वाजता कामासाठी बाहेर पडतो आणि ती 8 - 8:30 वाजता शाळेत जाते. ती दुपारी 3 किंवा 4 वाजता घरी परत येते आणि मग तिचा गृहपाठ होतो. तिच्या आईने तिला सांगितल्याप्रमाणे इतर गोष्टींसाठी ती वेळ देते. मी रात्री 10-11 वाजता घरी परततो आणि तोपर्यंत ती झोपायला गेलेली असते. त्यामुळे, मला तिला भेटायला वेळच मिळत नाही."
डेहराडूनस्थित वैष्णवीशी झालेल्या संभाषणात अमिताभ यांनी आपल्या नातीसोबत असलेल्या गोड नात्याबद्दल संभाषण केले. रविवारचा दिवस मात्र ते नातीसाठी देतात हे सांगताना बच्चन म्हणाले, "जेव्हा ती रविवारी मोकळी असते, तेव्हा मी तिच्याबरोबर काही काळ खेळतो."
जेव्हा आराध्या रागावलेली असते तेव्हा तिचे आजोबा तिला चॉकलेट देऊन राग घालवतात. तिला गुलाबी रंग आवडत असल्याने बच्चन आजोबा तिला गुलाबी हेअरबँड देतात.
वैष्णवी कुमारी 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये हॉटसीटपर्यंत पोहोचली आहे. क्विझ-आधारित रिअॅलिटी शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित केला जातो.
हेही वाचा - 'आम्ही जे भोगलो त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही': आर्यन खानच्या अटकेबाबत गौरी खानने सोडले मौन