मुंबई - Wish Rishiji was here : रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'अॅनिमल' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने आधीच चांगला प्रभाव पाडला आहे. रिलीजनंतर सोशल मीडियावर रणबीरनं साकारलेल्या विलक्षण व्यक्तीरेखेचं कौतुक होत आहे. काहींनी त्याच्या 'करिअरमधील सर्वोत्तम अभिनय' असल्याचं म्हटलंय. आता, रणबीरची आई नीतू कपूरनंही लेकाच्या कामाचं कौतुक केलंय. मुलाचं 'अॅनिमल' मधील काम पाहण्यासाठी आता ऋषी कपूर असायला हवे होते, असं नीतू यांनी म्हटलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
शनिवारी सकाळी इंस्टाग्राम स्टोरीजवर नीतू कपूरने रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटातील फोटो शेअर केला. ऋषी कपूर आज हे यश पाहण्यासाठी हवे होते असा भाव व्यक्त करताना नीतू यांनी लिहिले, 'ऋषीजी इथं हवे होते' आणि गोल्डन स्टार इमोजी टाकला. या फोटोत लांब केस असलेला रणबीर डार्क सनग्लासेसह दिसत आहे.
दोन वर्षे ल्युकेमियाशी झुंज दिल्यानंतर 30 एप्रिल 2020 रोजी अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नीतू कपूर अनेकदा ऋषी कपूर यांच्यासोबतच्या त्यांच्या हळव्या क्षणांचे थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. त्यांनी भूतकाळात शेअर केलेल्या खास आठवणी त्या जपत असतात.
'अॅनिमल' च्या रिलीजच्या आधी चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलिया भट्ट, शाहीन भट्ट, नीतू कपूर आणि इतर अनेक उपस्थितांसह चित्रपटासाठी स्टार-स्टडेड प्रीमियर आयोजित केला. 'अॅनिमल' पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडताना आलिया भट्टला या चित्रपटाबद्दल तिचं मत विचारण्यात आलं. हसत हसत तिनं खतरनाक असल्याचं सांगितलं.
'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती दिमरी यांच्या भूमिका आहेत. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट एक अॅक्शन-पॅक थ्रिलर आहे. या चित्रपटात रणबीर साकारत असलेल्या पात्राचा आपल्या वडिलांशी जटिल नातेसंबंध आहेत. तरीही वडिलांना इजा पोहोचवणाऱ्या लोकांशी तो पंगा घेतो. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला.'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती दिमरी यांच्या भूमिका आहेत. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट एक अॅक्शन-पॅक थ्रिलर आहे. या चित्रपटात रणबीर साकारत असलेल्या पात्राचा आपल्या वडिलांशी जटिल नातेसंबंध आहेत. तरीही वडिलांना इजा पोहोचवणाऱ्या लोकांशी तो पंगा घेतो. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला.
Also read: