ETV Bharat / entertainment

Vijay Varma and Alia wedding photo : आलिया भट्टसोबत लग्नाचा फोटो पाहून विजय वर्माच्या आईला बसला होता धक्का, वाचा काय घडले.. - विजयच्या फोटो फ्रेम्समध्ये एक पत्र

विजय वर्माने १० वर्षात बदली १४ घरे बदलली आहेत. आजही मुंबईत त्याचे स्वतःच्या मालकीचे घर नाही. पण लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास त्याला वाटतो. हॉलमध्ये आलिया भट्टसोबत त्याच्या लग्नाचा एक फोटो आहे, त्याचा किस्सा त्याने सांगितला आहे.

Vijay Varma and Alia wedding photo
आलिया भट्टसोबत विजय वर्माच्या लग्नाचा फोटो
author img

By

Published : Jun 16, 2023, 6:29 PM IST

मुंबई - अभिनेता विजय वर्मा कुठल्या घरात राहतो याबद्दल बऱ्याच जणांना उत्सुकता असेल. फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा संघर्ष करत स्थिर झालेल्या विजयचे अद्यापही स्वतःचे मुंबईत घर नाही. समुद्राकडे दिशा असलेल्या अपार्टमेंटमध्ये सध्या तो भाड्याच्या घरात राहतो. गेल्या १० वर्षात त्याने वेगवेगळ्या कारणांनी १४ घरे सोडून नवीन शोधली आहेत. या घराचे दर्शन घडवताना त्याने अनेक गंमतीशीर किस्सेही शेअर केले.

आलिया भट्टसोबत विजय वर्माच्या लग्नाचा फोटो - त्याच्या घरातील हॉलमध्ये काही फोटो फ्रेम्स आहेत. त्यातील अनेक त्याला गिफ्ट मिळाल्या आहेत. घरातील एका फोटोत तो आणि आलिया भट्ट एकत्र दिसतात. विषेष म्हणजे हा फोटो त्याचा आणि आलिया भट्टच्या विवाहाचा आहे. याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'हा फोटोशॉप केलेला फोटो आहे. डार्लिंग सिनेमात आलिया माझ्या पत्नीचा रोल करत होती, तेव्हाचा हा फोटो आहे. हा फोटो माझ्या आईने जेव्हा पहिल्यांदा पाहिला, तेव्हा तिला धक्का बसला, आणि तिने मला विचारले, तू लग्न केलंस? मग मी हसून तिला नाही म्हटले. हा एक प्रॅक्टीकल विनोद होता.'

अमिताभने पाठवलेले पत्र विजयने केलंय फ्रेम - विजयच्या फोटो फ्रेम्समध्ये एक पत्र त्याने फोटो फ्रेम केल्याचे दिसते. हे पत्र त्याला अमिताभ बच्चन यांनी पाठल्याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, 'गली बॉयमधील माझी भूमिका पाहून अमिताभ बच्चन यांनी मला हे पत्र आणि फुलांचा गुलदस्ता पाठवला होता. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी माझे काम आवडल्याचे कळवले होते आणि कौतुकही केले होते. दस्तुरखुद्दल अमिताभ यांनी कौतुक केल्यानंतर मी त्यापुढे एकही ऑडिशन दिलेली नाही. माझ्याकडे सतत काम असावे आणि मी कामातच गुंतलेला असावा असे वाटत होते, आता ते प्रत्यक्ष घडताना दिसत आहे'.

विजय वर्माचे चप्पल दुकान - या व्हिडिओत विजयचे किचन दिसू शकले नाही. जेव्हा त्याला दाखवण्याचा आग्रह झाला तेव्हा तो म्हणाला, 'तुम्ही इथं शुटिंग करणार आहेत म्हणून माझ्याकडे आलेल्यांना मी सध्या किचनमध्ये डांबून ठेवलंय. त्यामुळे किचन दाखवता येणार नाही'. त्याचे इतर घर दाखवण्यासाठी तो एका खोलीत आला. तेव्हा त्या खोलीची संपूर्ण भिंत त्याच्या शूजच्या जोड्यांनी भरलेली होती. 'माझी आई याला चप्पलचे दुकान म्हणते', असे तो म्हणाला.

दहाड आणि डार्लिंग्स या दोन्ही चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका केल्याबद्दल विजयचे कौतुक झाले आहे. ते आगामी नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरीज 2 मध्ये त्याची गर्लफ्रेंड तमन्ना भाटियासोबत दिसणार आहे. तमन्नानेही अलिकडेच विजय वर्मासोबत राहणे आवडत असल्याचे सांगून जणू प्रेमाची कबुलीच दिली होती.

हेही वाचा -

१. Karan Deol's Mehendi Ceremony : सनी देओलच्या घरी लगीनगाई, धर्मेंद्रच्या घरी वाजंत्र्यांची लगबग

२. Mayor Threatens To Ban Indian Films : आदिपुरुषसह हिंदी चित्रपटांवर नेपाळमध्ये बंदी घालण्याची धमकी, जाणून घ्या कारण..

३. Boycott Adipurush Trends : ट्विटरवर बॉयकॉट आदिपुरुष ट्रेंड, रावण आणि हनुमानाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.