ETV Bharat / entertainment

What is Project K? : काय आहे प्रोजेक्ट के? उत्कंठा शिगेला, निर्माते उचलणार शीर्षकावरील पडदा - प्रोजेक्ट के चे प्रॉडक्शन हाऊस

प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सायन्स फिक्शन प्रोजेक्ट के चित्रपटाबद्दल कमालीची उत्कंठा लागून राहिली आहे. हा नेमका प्रोजेक्ट के काय आहे? हे सांगण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत.

What is Project K
काय आहे प्रोजेक्ट के
author img

By

Published : Jul 8, 2023, 6:50 PM IST

मुंबई - गेल्या काही महिन्यापासून प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असललेल्या प्रोजेक्ट के चित्रपटाची चर्चा जोरदार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा झाल्यापासून चित्रपटाच्या शीर्षकाबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिलीय. यानंतर या चित्रपटात अमिताभ बच्चन सामील झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आणि अखेरीस या सिनेमात कमल हासनही भूमिका साकारतोय म्हटल्यावर उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. अखेर हे प्रोजेक्ट के प्रकरण आहे तरी काय?, असा सवाल प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालू लागलाय.

अमिताभ बच्चन आणि कमल हासन प्रदीर्घ काळानंतर एकाच चित्रपटत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहेत. ही गोष्ट प्रोजेक्ट के चित्रपटाला अधिक वेधक बनवत आहे. मात्र प्रोजेक्ट के हे शीर्षक का असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये प्रलंबितच आहे. याबद्दलचा अधिक तपशील गुलदस्त्यात ठेवल्यानंतर निर्माते यावरील पडदा दूर करण्याच्या मनःस्थितीत आहेत.

प्रोजेक्ट के चे प्रॉडक्शन हाऊस वैजयंती मूव्हीजने त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय की, 'काय आहे प्रोजेक्ट के? जाणून घ्यायचे आहे.' प्रभासच्या या आगामी चित्रपटाबद्दल लेटेस्ट अपडेट मिळाल्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आहे.

यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 'इतक्या धक्कादायक अपडेट देऊ नका, यामुळे आम्हाला धडकी भरते', असे एकाने लिहिलंय. अनेकांनी साकारात्म प्रतिक्रिया देताना प्रोजेक्ट के ची वाट पाहतोय म्हटलंय. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरणार याची खात्री देणाऱ्या प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान प्रोजेक्ट के चित्रपटाचे प्रमोशन आंतरराष्ट्रीय मंचावरुन केले जाणार आहे. येत्या १९ जुलै रोजी प्रतिष्ठित सॅन दिएगो कॉमिक-कॉन इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा टीझर, शीर्षकाचा तपशील आणि रिलीज तारीख लॉन्च केली जाणार आहे. या कार्यक्रमाला चित्रपटाच्या क्रू सह दिग्गज स्टार्स हजेरी लावणार असून कमल हासनही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आगामी बहुप्रतीष्ठित प्रोजेक्ट के मधून दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी तेलगू सिनेमात पदार्पण करत आहेत. प्रभासचा आदिपुरुष अपेक्षित यश मिळवू न शकल्याने या चित्रपटाकडून त्याचे चाहते खूप अपेक्षा ठेवून आहेत.

हेही वाचा -

१. Kartik Aaryan Luxury Apartment : कार्तिक आर्यनने जुहूमध्ये खरेदी केली आलिशान अपार्टमेंट, वाचा कसा ठरला व्यवहार

२. Bigg Boss Ott 2 : विदेशी स्पर्धक जैद हदीदने बिग बॉसचे घर सोडण्याची दिली धमकी...

३. Oh My God 2 Teaser : 'ओह माय गॉड २' टीझरची प्रतीक्षा संपली, मिशन इम्पॉसिबल ७ च्या रिलीजसोबत सुरू होणार प्रमोशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.