ETV Bharat / entertainment

Vicky Kaushal and Katrina Kaif : वाढदिवस साजरा करण्यासाठी विक्की कौशल पत्नी कतरिना कैफसह निघाला परदेशी... - विक्की कौशल पत्नी कतरिना कैफसह निघाला परदेशी

विक्की कौशल १६ जुलै रोजी पत्नी कतरिना कैफचा ४० वाढदिवस साजरा करणार आहे. या खास प्रसंगी हे जोडपे परदेशासाठी रवाना झाले असून या दोघांना मुंबई विमानतळावर पहाटे स्पॉट करण्यात आले.

Vicky Kaushal and Katrina Kaif
विक्की कौशल आणि कतरिना कैफ
author img

By

Published : Jul 15, 2023, 12:24 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. विक्की आणि कतरिनाची खूप फॅन फॉलोविंग आहे. याशिवाय हे जोडपे अनेकदा देशाबाहेर फिसताना दिसतात. आता पुन्हा एकदा कतरिना आणि विक्की परदेशी गेले आहेl. विक्की आणि कतरिना १५ जुलैच्या पहाटे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. हे जोडपे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर निघाले आहे. १६ जुलै रोजी कतरिना ही ४० वा वाढदिवस साजरा करणार आहे. यापtर्वी वाढदिवस आणखी खास सेलिब्रेट करण्यासाठी विक्की हा कतरिनाला देशाबाहेर घेऊन जात आहे. दरम्यान हे जोडपे मुंबई विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये एकत्र दिसले.

कतरिना आणि विक्की जोडी दिसत होती सुंदर : कतरिना कैफने यावेळी लाईट ब्लू रंगाचा जीन्ससह पांढऱ्या रंगाचे फुले असणारे टॉप परिधान केले होते. याशिवाय तिने यावर चष्मा घालून आपले केस मोकळे सोडले होते. त्याचबरोबर विक्कीने कौशल हा ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये कूल दिसत होता. विक्कीने पांढरी टी-शर्ट, हुडी आणि डाक्र ब्लू रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता, आणि यावर त्याने टोपीसह चष्मा घातला होता. दोघेही हातात हात घालून हसत विमानतळाच्या आत प्रवेश करत होते. या व्हिडिओत विक्की कतरिनाची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत : कतरिना आणि विक्कीला विमानतळावर एकत्र पाहून चाहत्यांनी भरभरून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. चाहत्यांनी या जोडीचे भरपूर कौतुक केले आहे. दरम्यान आतापासून चाहते कतरिनाला तिच्या ४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले होते. त्यांचे लग्न फार वेगळे झाले होते. या लग्नात मीडियाला एन्ट्री नव्हती त्यामुळे फारच गृप्त पद्धतीने यांचे लग्न झाले. कतरिनाच्या लग्नात चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आले होते. या लग्नात मात्र कतरिनाचा खास मित्र सलमान आला नव्हता. या जोडप्याचे चाहते हे दोघे कधी आई-वडील होईल याची वाट पाहत आहेत. दरम्यान आता कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्याबाबत सोशल मीडियावर बातम्या पसरत आहेत. ही जोडी उद्या १६ जुलै रोजी आपल्या चाहत्यांना काही आनंदाची बातमी देईल अशी आशा चाहते करत आहे.

हेही वाचा :

  1. Baipan Bhari Deva : बाईपण भारी देवाने रचला इतिहास, दुसऱ्या आठवड्यात कमाईने गाठली ९८ टक्केंची उंच उडी
  2. Kareena's Italy diary : करीनाने पोस्ट केले नयनरम्य फोटो, एकाच फ्रेममध्ये दिसले निसर्गासह तिचे सौंदर्य
  3. Bawaal song Dil Se Dil Tak: वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'बवाल' चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.