ETV Bharat / entertainment

Chiyaan 62 : तमिळ स्टार चियान विक्रमनं केली 'चियान 62' चित्रपटाची घोषणा ; व्हिडिओ केला पोस्ट - चियान विक्रमचा देसी अवतार

Chiyaan 62 : तमिळ स्टार चियान विक्रम त्याच्या 'चियान 62' साठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या घोषणेबाबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो देसी स्वॅग दाखवताना दिसत आहे.

Chiyaan 62
चियान 62
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 5:30 PM IST

मुंबई - Chiyaan 62 : साऊथ अभिनेता चियान विक्रम दक्षिणेपासून ते हिंदी पट्ट्यापर्यंत प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रेक्षक त्याच्या प्रत्येक चित्रपटांची वाट पाहत असतात. काही काळापूर्वी तो त्याच्या 'कोब्रा' आणि 'पोनियिन सेल्वन' सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत होता, तर अलीकडे त्यानं त्याच्या चाहत्यांना आणखी एक गोड भेट दिली आहे. चियान विक्रमनं सोशल मीडियावर आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या घोषणेबाबत व्हिडिओ शेअर करताना त्याचा देसी स्वॅग त्यानं दाखविला आहे. 'ध्रुव नटचथिराम अध्याय भाग 1 - युद्ध कंदम' आणि 'थंगालन' या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर हा त्याचा सलग तिसरा चित्रपट आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

विक्रमने नवीन चित्रपटाची घोषणा केली : चियान विक्रमनं पोस्टवर लिहलं, 'सु अरुण कुमारच्या अविश्वसनीय प्रतिभेसह माझ्या आगामी चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित घोषणा व्हिडिओचे अनावरण करताना मी रोमांचित आहे'. या पोस्टमध्ये त्यानं चित्रपटाच्या क्रू मेंबर देखील टॅग केलं आहे. 'चियान 62' च्या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन-क्राइम-थ्रिलर असेल. व्हिडिओची सुरुवात बंदुकीच्या गोळीच्या आवाजाने सुरू होते. तिरुट्टानी या छोट्या शहरातील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये लग्नमध्ये बॅड वाजविणाऱ्या गटाला अटक करताना दाखविले गेले आहे. मग एक महिला अचानक येते आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल करते. त्यानंतर विक्रमची पोलीस स्टेशनमध्ये एंट्री होते. तो पोलिसांसोबत बोलून पोलीस ठाण्यातून बाहेर पडतो. विक्रमचा हा व्हिडिओ खूप जबरदस्त आहे.

विक्रमचा वर्क फ्रंट : विक्रमच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन' या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये शेवटी दिसला होता. तो पुढे 'ध्रुव नचाथिरम: चॅप्टर वन - युद्ध कंदम' या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये दिसणार आहे, जो 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासोबतच दिग्दर्शक पा रंजित यांचा 'थंगालन' या चित्रपटाही तो झळकणार आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Indian 2 major update : कमल हासन स्टारर 'इंडियन 2'ची इंट्रो'सह पहिली झलक लवकरच मिळणार पाहायला
  2. Bigg Boss 17 Updates: 'बिग बॉस 17'मध्ये होणार आता धमाका ; प्रोमो झाला व्हायरल...
  3. Tejas Vs 12th Fail Box Office Clash: 'तेजस' चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला, 'ट्वेल्थ फेल' सिनेमाला समीक्षकांची पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.