ETV Bharat / entertainment

Suhana Khan Birthday : 'नेहमी आनंदीत राहा बाळा', म्हणत शाहरुखने लाडक्या लेकीला दिल्या शुभेच्छा - शाहरुखने शेअर केलेली व्हिडिओ क्लिप

लाडकी लेक सुहाना खानच्या वाढदिवसानिमित्य शाहरुख खानने एक सुंदर व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक छोटी सुंदर चिठ्ठीही लिहिलीय.

Suhana Khan Birthday
शाहरुखने लाडक्या लेकीला दिल्या शुभेच्छा
author img

By

Published : May 22, 2023, 5:10 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याची लाडकी मुलगी सुहाना खानच्या वाढदिवसानिमित्य तिची एक सुंदर व्हिडिओ छोटी क्लिप शेअर केली. शाहरुखची छोटी राजकुमारी सुहाना खानबद्दल सुपरस्टार नेहमीच हळवा दिसला आहे. 'तू आज आणि कायमस्वरुपी आनंदीत राहावी असा आजचा दिवस आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा', असे शाहरुख खानने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे.

शाहरुखने शेअर केलेली व्हिडिओ क्लिप - सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी मुलांपैकी एक असलेल्या सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुहाना हॅरी स्टाइल्सचे गाणे वॉटरमेलन शुगर गाणे पार्श्वभागात वाजत असून त्यावर ती आइस स्केट्स घालून फिरताना दिसत आहे. काळ्या क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये ती छान दिसते.

शाहरुखच्या पोस्टला सुहानाची प्रतिक्रिया - तिच्यासाठी असलेल्या पोस्टवर सुहानानेही तत्परतेने प्रतिक्रिया दिली. सुरुवातीला, सुहानाने 'हेहेहे'सह जीभ बाहेर हसणारा इमोटिकॉन आणि हार्ट इमोटिकॉन लिहिले. काही वेळानंतर, सुहानाने पुन्हा कमेंट केली आणि वडिलांवरील आपले प्रेम व्यक्त केले. मुलीबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल चाहते शाहरुखच्या पोस्टवरकमेंट करत आहेत.

शनाया कपूरने दिल्या सुहानाला शुभेच्छा - दरम्यान, सुहानाची जिवलग मैत्रिण शनाया कपूरनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो शेअर करत स्टारकिडला शुभेच्छा दिल्या. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शनायाने दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत तिने लिहिले: 'जुळ्या बहिणीला कायमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'. तर दपसऱ्या फोटोत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शनाया आणि सुहाना या दोघीही स्टार किड्स आहेत आणि खूप चांगल्या मैत्रीणीही आहेत. दोघी नेहमी एकमेकींचे कौतुक करताना थकत नाहीत.

दरम्यान, सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्यासोबत झोया अख्तरच्या द आर्चीजमध्ये दिसणार आहे. खुशी आणि अगस्त्य देखील या नेटफ्लिक्स मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. निर्मात्यांनी अद्याप रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.

हेही वाचा - Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मा विराट कोहलीला पापाराझींनी केल मुंबईत विमानतळावर स्पॉट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.