ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor : रणबीर कपूरला चाहत्यांनी घेरले, सेल्फी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - रणबीर कपूरला चाहत्यांनी घेरले

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर काल रात्री मुंबईतील एका शूटिंग सेटच्या बाहेर स्पॉट झाला. रणबीर जसा चाहत्यांना दिसला तसे चाहत्यांनी त्याला घेरले. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. दरम्यान यावेळी रणबीरने देखील चाहत्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर
author img

By

Published : Jul 14, 2023, 2:45 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'मुळे फार चर्चेत आहे. रणबीरचा लवकरच हा चित्रपट रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. रणबीरचा हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, रणबीरला मुंबईमध्ये शूट लोकेशनच्या बाहेर त्याच्या काही चाहत्यांनी घेरले. त्यानंतर रणबीरनेही त्यांच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी एकामागून एक सेल्फी काढली.

सेल्फी घेताना दिसला रणबीर : दरम्यान आता रणबीरचा सेल्फी घेतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणबीरच्या या व्हिडिओला चाहते फार भरभरून प्रेम देत आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर रणबीरचे चाहते त्याचे फार कौतुक करत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर हा काळ्या रंगाच्या शर्ट आणि शॉर्टमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये रणबीर हा फार देखणा दिसत आहे. तसेच यावेळी रणबीरला बघण्यासाठी अनेक फिमेल फॅन्स आल्या होत्या. त्यानंतर रणबीरनेही त्याच्या फिमेल फॅन्सवर प्रेमाचा वर्षाव केला.

चाहत्यांनी रणबीर कपूरचे केले कौतुक : रणबीर कपूरने सेल्फी काढलेल्या या व्हायरल व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेम देत आहेत, तर काही युजर्स याला रणबीरचा ड्रामा असल्याचे म्हणत आहेत. रणबीरच्या या व्हिडिओवर फार जास्त प्रमाणात कमेंट येत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले, 'किती सुंदर दिसत आहे रणबीर' तर दुसऱ्या चाहत्याने लिहले, 'जगातून सर्वांत सुंदर बाबा अवतरला' आणखी एका चाहत्याने लिहले, 'फारच सुंदर' याशिवाय आणखी दुसऱ्या चाहत्याने लिहले, 'नवरा आणि बायको आज फार गोड वागत आहे आणि फार प्रेम देखील करत आहे' अशा अनेक कमेंट येत आहेत. दरम्यान काही चाहते रणबीरच्या हावभावाचे कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत रणबीर हा चाहत्यांना प्रेमाने वागवत आहे. त्यामुळे हे खरचं कौतुकास्पद गोष्ट आहे. रणबीरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट आता १ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. YRF's Spy Universe : यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भट्टची एंट्री...
  2. SPKK Collection Day 15 : 'सत्यप्रेम की कथा'ची बॉक्स ऑफिसवरील पकड ढिल्ली, पाहा १५ व्या दिवसाची कमाई
  3. Alia bhatt : पापराझीची हरवलेली चप्पल आलिया भट्टने उचलली, सोशल मीडियावर झाली ट्रोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.